वाडेगाव परिसरात कांदा लागवडीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:20+5:302021-01-25T04:19:20+5:30
गतवर्षी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने परिसरात कांद्याचे क्षेत्र घटले होते. दरम्यान, यंदा विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा ...
गतवर्षी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने परिसरात कांद्याचे क्षेत्र घटले होते. दरम्यान, यंदा विहिरी, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातून परिसरात बागायती क्षेत्र अधिक असून, रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघण्यासाठी शेतकऱ्यांचा कल कांदा पिकाकडे वळला आहे. परिसरात बहुतेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन झाले असून, सद्यस्थितीत कांदा पेरणीला सुरुवात केली आहे. कांदा बियाण्याचे भाव गगनाला भिडले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच तूर सोंगणी, कापूस वेचणी व कांदा लागवडीचे कामे एकाच वेळी आल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ज्यादा मजुरी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
---------------------------------------------------
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही मदत मिळाली नाही, परंतु कांद्याला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांची निराशा दूर करावी.
-रमेश चिंचोळकर, कांदा उत्पादक शेतकरी, वाडेगाव.