संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:31+5:302021-07-20T04:14:31+5:30
श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाने या सप्ताहाला प्रतिवर्षी प्रारंभ होत असतो. यंदा या पुण्यतिथी महोत्सवाचे बारावे वर्ष आहे. यानिमित्त रविवारी ...
श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणाने या सप्ताहाला प्रतिवर्षी प्रारंभ होत असतो. यंदा या पुण्यतिथी महोत्सवाचे बारावे वर्ष आहे. यानिमित्त रविवारी पहाटे श्रींचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर संस्थेचे सहसचिव मोहनराव जायले पाटील यांच्या हस्ते तीर्थ स्थापना होऊन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ झाला. पारायण पीठाचे नेतृत्त्व हभप अनंता महाराज अवारे करीत आहेत. सप्ताहामध्ये दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असा कार्यक्रम सुनियोजित आहे. रविवारी दुपारच्या सत्रात हभप अनंता महाराज अवारे यांची प्रवचन सेवा, तर रात्रीच्या सत्रामध्ये संस्थाध्यक्ष हभप वासुदेवराव महाराज महल्ले यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. सप्ताहामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखणे, मास्क वापरणे आदी शासनाच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने सप्ताह संपन्न होत आहे.