एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:06+5:302021-09-11T04:20:06+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्रीकृष्ण अमरावतीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, ...

Commendation of students who have passed NMMS exam | एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

एनएमएमएस परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव श्रीकृष्ण अमरावतीकर होते.

प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी दिलीप तायडे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, मुख्याध्यापक संघाचे महानगर सरचिटणीस प्रा. प्रकाश डवले, मुख्याध्यापक संघाचे सचिव संजय साबळे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य माधव मुन्शी, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष डॉ. प्रा. रवींद्र भास्कर होते.

निवडप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी इन्स्पायर अवाॅर्ड मानक योजना जिल्हास्तरीय प्रदर्शनकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रा. रवींद्र भास्कर यांनी विद्यार्थी जीवनातील एनएमएमएस परीक्षेचे महत्त्व व इन्स्पायर अवाॅर्ड मानक प्रदर्शनाच्या आयोजनासंबंधी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला आरएलटी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. पूनम अग्रवाल, शशिकांत बांगर, सुरेश बाविस्कर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अकोला तालुका ग्रामीण विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विजय पजई यांनी, तर आभारप्रदर्शन शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सरफराज खान, ओरा चक्रे यांनी केले.

फोटो:

Web Title: Commendation of students who have passed NMMS exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.