वाणिज्य वार्ता अकोला, बुलडाणा, वाशिम : दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:23 AM2021-04-30T04:23:26+5:302021-04-30T04:23:26+5:30
परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गाफील राहू नये. कारण, आता कोणताही अंदाज उपलब्ध नसल्याने व भविष्यातील सर्वच ...
परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गाफील राहू नये. कारण, आता कोणताही अंदाज उपलब्ध नसल्याने व भविष्यातील सर्वच परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होणार आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखीन वाढली असून सोबतच स्पर्धाही वाढलेली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याचे ध्येय आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी काळपांडे सरांनी त्यांच्या पडताळणीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शासकीय व नामांकित वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता घेण्यात येणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सखोल मार्गदर्शन करणारे ललित काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्समध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२३ करिता ११ वी, १२ वी, नीट (वैद्यकीय) व जे.ई.ई. (अभियांत्रिकी) पूर्वपरीक्षा कॅप्सुल बॅच (ऑफलाईन व ऑनलाईन) कोचिंगकरिता प्रवेश परीक्षेचे आयोजन केलेले आहे. या प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व विशेषकरून पालकांना आपल्या पाल्यांचे मूल्यांकन करून घेण्यासाठी व त्याच्या योग्यतेनुसार सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत होईल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना क्लासेसतर्फे ५०% पर्यंत एल.टी.एस.ई. स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी, याकरिता क्लासतर्फे दरवर्षीच प्रवेश परीक्षा (एन्ट्रन्स टेस्ट) आयोजित करण्यात येते. एल.टी.एस.ई. स्कॉलरशिप एन्ट्रन्स टेस्टद्वारे विदर्भ-मराठवाडा व खान्देशमधून शेकडो विद्यार्थ्यांनी ५०% पर्यंत एल.टी.एस.ई. स्कॉलरशिपचा फायदा घेऊन आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे व करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२३ करिता ११वी, १२वी, नीट (वैद्यकीय) व जे.ई.ई. (अभियांत्रिकी) पूर्वपरीक्षा (२ वर्षीय क्लासरूम ऑफलाईन व ऑनलाईन) कोचिंगकरिता ही एन्ट्रन्स टेस्ट रविवार दि. २ मे २०२१ रोजी ऑनलाईन घेण्यात येणार आहे. एन्ट्रन्स एक्झामची वेळ दुपारी २ ते ३ अशी आहे व सदर एन्ट्रन्सचा निकाल रविवारी संध्याकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. एन्ट्रन्स एक्झाम ही इयत्ता १० वी चे गणित, विज्ञान व बुध्दिमत्ता चाचणी अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टीव्ह) प्रश्नप्रणालीवर राहील.काळपांडे सरांच्या कॅप्सुल बॅचचे वैशिष्टे म्हणजे, ऑफलाईनप्रमाणेच ऑनलाईन बॅचही लाईव्ह राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न तसेच शंकांच्या निरसनासाठी वेगळा वेळ देण्यात येणार असून ऑनलाईन टेस्ट, रिझल्ट तसेच पालकांची नियिमत ऑनलाईन सभासुध्दा घेण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चरसुध्दा उपलब्ध करुन देण्यात येतील. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेला वेळ मिळण्याच्या दृष्टिकोनातून व २०२३ मध्ये होणाऱ्या मेडिकल व अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेची कसून तयारी करून घेण्याच्या दृष्टीने लवकरच बॅच सुरू करण्यात येणार आहे. ललित ट्युटोरिअल्सची १४ एप्रिल २०२१ रोजी प्रथम बॅच सुरू झालेली आहे, हे विशेष. पूर्वपरीक्षांसाठी दरवर्षीच ललित ट्युटोरिअल्सने काळपांडे सरांच्या मार्गदर्शनात सर्वोत्तम निकालाचा चढता आलेख दिला असून यशाची परंपरा कायम राखली आहे. क्लासच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या के.ई.एम., सायन, नायर, जे.जे., कुपर-मुंबई, बी.जे.एम.सी. पुणे, जी.एम.सी. नागपूर, आय.जी.एम.सी. नागपूर, जी.एम.सी. औरंगाबाद, जी.एम.सी. अकोला, चंद्रपूर, यवतमाळ धुळे इत्यादी महाविद्यालयांत आपला प्रवेश निश्चित करून बाजी माजी मारली, हे विशेष. ललित ट्युटोरिअल्समधील क्लासरूम या अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकाशनाच्या असंख्य पुस्तकांचा संच असलेले अभ्यासाकरिता अद्ययावत ग्रंथालय आहे. एकंदरीत वैद्यकीय व अभियांत्रिकीचे स्वप्न बाळगणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अद्ययावत कोचिंग इन्स्टिट्युट आहे, हे नक्की. यावर्षी दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना क्लासच्या एन्ट्रन्स एक्झामच्या निकालात मिळालेल्या गुणांच्या आधारावरच काळपांडे सरांच्या मेडिकल व इंजिनिअरिंगकरिता परिपूर्ण कॅप्सुल बॅचमध्ये ५०% पर्यंत एल.टी.एस.ई. स्कॉलरशिप व प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित रविवार, दि. २ मे २०२१ रोजी होणाऱ्या एन्ट्रन्स एक्झामकरिता नावाचे रजिस्ट्रेशन वेबसाईटवर करावे, असे आवाहन काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्सच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
१२ बाय़ १०