वाणिज्य वार्ता - ललीत ट्युटोरिअल्सची वर्ग ८, ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन व ऑफलाईन कोचिंग बॅचकरिता रजिस्ट्रेशन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:13+5:302021-04-09T04:19:13+5:30
ह्या सर्व बाबींचा विचार करुन ललीत ट्युटोरियल्सच्या श्री ललीत काळपांडे सरांनी ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता ...
ह्या सर्व बाबींचा विचार करुन ललीत ट्युटोरियल्सच्या श्री ललीत काळपांडे सरांनी ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता मागील वर्षी अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष रिव्हीजन बॅचचे आयोजन करुन कोचिंग देण्याचे निश्चित केले आहे.
ललीत ट्युटोरियल्सच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ करिता ऑफलाईन व ऑनलाईन कोचिंगकरिता प्रवेशप्रक्रिया सुरू केलेली आहे. सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या पराकोटीच्या स्पर्धेत आपल्याकडील विद्यार्थ्यांचा समतोल कायम राहावा व भविष्यातील स्पर्धात्मक युगाचे भान ठेवून यावर्षी ८, ९ व १० व्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वर्ग ९ च्या विद्यार्थ्यांची मॅथ्स्, सायन्ससह होमिभाभा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार असून वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वच विषयांच्या तयारीसह नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार असल्याचे काळपांडे सरांनी यावेळी सांगितले. वर्ग ८ व ९ वी करिता आवश्यकतेनुसार इतरही विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे, हे विशेष.
काळपांडे सरांच्या ललीत ट्युटोरिअल्स् चे मार्गदर्शन बाहेरगांवच्या विद्यार्थ्यांनाही उपलब्ध व्हावे अशी असंख्य पालकांच्या आलेल्या विनंतीवरून यावर्षीपासून ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात आलेले आहे. हे ऑनलाईन क्लासेस दररोज राहणार आहेत. विद्यार्थ्यांना वेळोवेळी उच्चशिक्षीत अभ्यासू विषयतज्ञांचे विशेष मार्गदर्शनही मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या शंका, अडी-अडचणी सोडविण्यासाठी वेगळे सत्र / वेळापत्रक राहणार असुन प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वतंत्ररित्या विस्तृत स्पष्टीकरण व विश्लेषणासह शंकाचे समाधान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन टेस्ट राहणार असुन त्या टेस्टचा निकाल ऑनलाईनच राहणार आहे. नियमीत ऑनलाईन पालकसभा घेण्यात येतील व विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकांचे विस्तृतपणे निरसन केल्या जाईल.
ललीत ट्युटोरिअल्सचे संचालक काळपांडे सर यांनी वर्ग ८, ९ व १० वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व त्याच्या पालकांकरीता महत्त्वाचा संदेश सांगीतला की, शाळेच्या संपुर्ण अभ्यासक्रमासोबतच सर्वच स्पर्धा परीक्षा जसे होमीभाभा,
ऑलंपियाड, के.व्ही.पी.वाय., एन.टी.एस.ई., आर.एम.ओ. व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी ह्या वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टीव्ह टाईप) प्रणालीवर आधारीत असल्याने विद्यार्थ्याचा बुध्यांक वाढतो, असेही काळपांडे सर म्हणाले. स्टेट बोर्ड व सि.बी.एस.ई. च्या विद्यार्थ्यांकरीता वेगवेगळ्या बॅचेस करण्यात आल्या आहेत.
महत्वाची सुचना - वर्ग ८, ९ व १० व्या वर्गाच्या पालकांची सभा मंगळवार दि. १३/०४/२०२१ रोजी सायंकाळी ठिक ८.०० वाजता ऑनलाईन होईल, पालकांनी दि. १३/०४/२०२१ रोजी संध्याकाळी ७.०० नंतर कार्यालयाशी सम्पर्क करुन किंवा फोन करुन घ्यावा. त्या सभेमधे श्री काळपांडे सर विद्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परिक्षा व भविष्यामधे होणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षा निट, जेईई इत्यादी परिक्षेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
ZOOM MEETING च्या नाव नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी काळपांडे सरांचे ललीत ट्युटोरिअल्स्, तोष्णीवाल लेआऊट, अकोला येथे संपर्क साधावा असे क्लासच्या व्यवस्थापकांनी कळविले आहे.
- १२ बाय १०