वाणिज्य वार्ता - दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एल. टी.एस.ई. स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:15+5:302021-02-05T06:13:15+5:30

क्लासच्या विशेष कॅप्सुल बॅचमध्ये दरवर्षी असंख्य विद्यार्थी प्रवेशास इच्छुक असतात. या सर्व विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी याकरिता ...

Commerce News - Online L.A. for students studying in class X. T.S.E. Scholarship exam Sunday | वाणिज्य वार्ता - दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एल. टी.एस.ई. स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

वाणिज्य वार्ता - दहावीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एल. टी.एस.ई. स्कॉलरशीप परीक्षा रविवारी

googlenewsNext

क्लासच्या विशेष कॅप्सुल बॅचमध्ये दरवर्षी असंख्य विद्यार्थी प्रवेशास इच्छुक असतात. या सर्व विद्यार्थ्यांना क्लासमध्ये प्रवेशासाठी समान संधी मिळावी याकरिता क्लासतर्फे दरवर्षीच प्रवेश परीक्षा (एन्ट्रन्स टेस्ट) आयोजित करण्यात येते. एल.टी.एस.ई. स्कॉलरशीप

एन्ट्रन्स टेस्टद्वारे विदर्भ-मराठवाडा व खान्देशमधून शेकडो विद्यार्थी दरवर्षी १०० टक्केपर्यंत एल.टी.एस.ई. स्कॉलरशीपचा फायदा घेऊन आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार करतात.

यावर्षी दहावी सि.बी.एस.ई. व दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२३ करिता ११वी, १२वी, नीट (वैद्यकीय) व जे.ई.ई. (अभियांत्रिकी) पूर्वपरीक्षा (२ वर्षीय क्लासरूम ऑफ लाईन व ऑनलाईन) कोचिंगकरिता ही एन्ट्रन्स टेस्ट रविवार, दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन घेण्यात येणार आहे. एन्ट्रन्स एक्झामची वेळ दुपारी २ ते ३ अशी आहे. एन्ट्रन्सचा निकाल हा रविवारी संध्याकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. एन्ट्रन्स एक्झामकरिता विद्यार्थ्याने आपले नाव www.lalittutorials.com या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. एन्ट्रन्स एक्झाम प्ले स्टोअरवरून एल.टी.एस.ई. ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे देता येईल. एन्ट्रन्स एक्झाम ही इयत्ता १०वीचे गणित व विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ (ऑबजेक्टीव्ह) प्रश्नप्रणालीवर राहील.

काळपांडे सरांच्या कॅप्सुल बॅचचे वैशिष्ट म्हणजे ऑफलाईनप्रमाणेच ऑनलाईन बॅचही लाईव्ह राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक _ विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न तसेच शंकांच्या निरसनासाठी वेगळा वेळ देण्यात येणार असून, ऑनलाईन टेस्ट, रिझल्ट

तसेच नियमित पालकांची ऑनलाईन सभासुध्दा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धा परीक्षेला वेळ मिळण्याच्या दृष्टिकोनातून व २०२३ मध्ये होणाऱ्या मेडिकल व अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेची कसून तयारी करून घेण्याच्यादृष्टीने १४ जून २०२१ रोजी ही कॅप्सुल बॅच सुरू होणार आहे, असे यावेळी काळपांडे सरांनी सांगितले. या कॅप्सुल बॅचचे वैशिट्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट निकाल देऊन अकोल्याला संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणारे काळपांडे सर यांच्यासह राष्ट्रीय स्तरावर या परीक्षेसाठी शिकविण्याचा १५ ते २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.

काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्सने यावर्षी म्हणजेच २०२० च्या नीट परीक्षेत एकूण १९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शासकीय मेडिकल कॉलेजकरिता प्रवेशास पात्र केले आहे. क्लासचा शंतनू दाळू याने नीट परीक्षेत ६६० गुण प्राप्त केले असून, तब्बल ४० विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, हे विशेष. यात अती प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या के .ई.एम. मेडिकल कॉलेज मुंबईकरिता ९ विद्यार्थी, जे. जे. मेडिकल कॉलेज मुंबईकरिता १४ विद्यार्थी, तर उर्वरित विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या नामांकित शासकीय मेडिकल कॉलेजला आपला प्रवेश निश्चित केला आहे. तसेच यावर्षी क्लासच्या ३ विद्यार्थ्यांनी बॉयोलॉजी विषयात ३६० पैकी ३५० च्या वर गुण प्राप्त केलेले आहेत. तसेच अभियांत्रिकी कॉलेजला तब्बल १३६ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून रितेश सोळंके व्ही. एन. आय. टी. नागपूर, निकिता टेकाडे, आर. एन. आय. टी., जयपूर महाविद्यालयामध्ये प्रवेशास पात्र झाले आहेत. ललित ट्युटोरिअल्सने दरवर्षीच उच्चांक गाठणारे निकाल दिलेले आहेत. यात वर्ष २०१८ च्या निकालामध्ये क्लासचा शिवम सुरेश देशमाने हा ओबीसी वर्गातून भारतात १७ वा, महाराष्ट्रातून ३ रा, तर विदर्भातून प्रथम आला आहे. त्याने ७२० पैकी ६५१ गुण प्राप्त केले असून, तो केमेस्ट्री विषयात १६५ गुण घेऊन अकोल्यातून प्रथम आला आहे. क्लासचा प्रशिस सुनील सिरसाट हा आय. आय. टी. मद्रासकरिता प्रवेशास पात्र झाला आहे. त्याचप्रमाणे मंगेश विजय हाडे हा बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३४० गुण घेऊन अकोल्यातून टॉपर ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून, एकूण वैद्यकीय महाविद्यालयाकरिता १३९ व अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता ११८ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले. त्याचप्रमाणे यावर्षी म्हणजेच २०१९ क्लासचे तब्बल १४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मेडिकल क्षेत्रात व ११० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय यश प्राप्त करून आपले डॉक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार केले. यामध्ये क्लासचा प्रथमेश अरविंद उमाळे याने ६५१ मार्क्स प्राप्त केले आहेत. तसेच शामल तेलंगडे याने इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जाण्याकरिता ९९.९९ पर्सेनटाईल गुण प्राप्त केलेले आहेत, हे विशेष. मेडिकलचे क्षेत्र असो किंवा इंजिनिअरिंगचे क्षेत्र असो, याकरिता आवश्यक असणाऱ्या पूर्वपरीक्षांसाठी दरवर्षीच ललित ट्युटोरिअल्सने काळपांडे सरांच्या मार्गदर्शनात सर्वोत्तम निकालाचा चढता आलेख दिला असून, यशाची परंपरा कायम राखली. क्लासच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या के. ई. एम., सायन, नायर, जे. जे., कुपर-मुंबई, बि.जे.एम.सी. पुणे, जि. एम. सी. नागपूर, आय. जि. एम. सी., नागपूर, जि. एम. सी., औरंगाबाद, जि. एम. सी., अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, धुळे आदी महाविद्यालयांत आपला प्रवेश निश्चित करून बाजी माजी मारली हे विशेष.

ललित ट्युटोरिअल्समधील क्लासरूम या अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकाशनांची असंख्य पुस्तके असलेले अद्ययावत ग्रंथालय अभ्यासाकरिता आहे. एकंदरीत वैद्यकीय व अभियांत्रिकीचे स्वप्न बाळगणाऱ्या विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अद्ययावत कोचिंग इंस्टिट्यूट आहे हे नक्की.

यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना क्लासच्या एन्ट्रन्स एक्झामच्या निकालात मिळालेल्या गुणांच्या आधारावरच काळपांडे सरांच्या मेडिकल व इंजिनिअरिंगकरिता परिपूर्ण कॅप्सुल बॅचमध्ये १०० टक्के पर्यंत एल.टी.एस.ई. स्कॉलरशिप व प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित रविवार, दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या एन्ट्रन्स एक्झामकरिता नावाचे रजिस्ट्रेशन www.lalittutorials.com या वेबसाईटवर करावे, असे आवाहन काळपांडे सरांच्या ललित ट्युटोरिअल्स, पाण्याच्या टाकीजवळ, तोष्णीवाल लेआऊट, अकोलाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

Web Title: Commerce News - Online L.A. for students studying in class X. T.S.E. Scholarship exam Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.