वाणिज्य वार्ता : अकोल्यातील ‘रिलायन्स हॉस्पिटल’तर्फे सुमारे ८,००० रेडिएशनथेरपी यशस्वीरीत्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:10+5:302021-02-05T06:13:10+5:30
अकोला : अकोल्यातील ‘रिलायन्स हॉस्पिटल’ सुरू झाल्यापासून येथे ‘रेडिएशनथेरपी’ची ८,००० सत्रे घेण्यात आली आहेत, तसेच येथे ‘केमोथेरपी’चे विविध उपचार ...
अकोला : अकोल्यातील ‘रिलायन्स हॉस्पिटल’ सुरू झाल्यापासून येथे ‘रेडिएशनथेरपी’ची ८,००० सत्रे घेण्यात आली आहेत, तसेच येथे ‘केमोथेरपी’चे विविध उपचार देण्यात येतात व बाह्यरुग्णांना सल्ला दिला जातो. या केंद्रामध्ये आरोग्य तपासणी, कर्करोगनिदान शिबिरे यांचे अनेकदा आयोजन करण्यात आलेले आहे. या भागातील वैद्यकीय समुदायांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रमही घेण्यात येत असतात. स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्ययावत उपचारांविषयी माहिती देणे, हे काम हे केंद्र करीत असते. मुंबईतील ‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’मधील उच्च प्रशिक्षित व समर्पित सल्लागारांनी येथील उपचार पद्धतीला मान्यता दिली आहे. त्यायोगे जागतिक स्तरावरील उपचारांचा रुग्णांना फायदा होत आहे. देशात कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कर्करोगांवरील अत्याधुनिक उपचार केवळ मेट्रो शहरांपुरतेच मर्यादित न ठेवता, महाराष्ट्रातील मध्यम व लहान शहरांमध्येदेखील देता यावेत, यासाठी अकोल्यात ‘रिलायन्स कॅन्सर केअर सेंटर’ उभारण्यात आले. हे केंद्र सुरू झाल्यापासून अकोला व विदर्भ परिसरातील रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार देण्यात येऊ लागले आहेत. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाणारे रुग्ण, आता त्याच गुणवत्तेचे उपचार आपापल्या गावीच घेऊ लागले आहेत. आत्यंतिक काळजी घेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ (एमजेपीजेवाय) अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारची ही प्रमुख आरोग्य विमा योजना ‘ए’ दर्जाची असून, या भागात हा दर्जा आणि आयुष्मान भारत (एबी-पीएमजेवाय) मिळविणारे हे पहिले
आणि एकमेव रुग्णालय आहे. ‘रेडिएशन ऑन्कोलॉजी’चे सल्लागार डॉ. शिझान परवेझ म्हणाले, ‘गरजू रुग्णांना कर्करोगाचे सर्वोत्कृष्ट उपचार देण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या भागातील रुग्णांना अनुभवी स्पेशालिस्ट डॉक्टर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान याआधारे कर्करोगावरील प्रगत उपचार देण्यात आमचे सेंटर नेहमीच अग्रभागी असते. या तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक ‘ट्रूबीम मशीन’चे ‘केव्ही-आयजीआरटी मॉड्यूल’, ‘आयएमआरटी’, ‘आयजीआरटी’, ‘रॅपिडआर्क’, ‘सीआरटी’ आणि ‘पॅलिएटिव्ह केअर’ यांचा समावेश आहे. आमच्या रुग्ण-केंद्रित सेवांमधून सर्वांना कर्करोगावरील उपचार मिळावेत, यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करू.’ प्रगत, परवडणाऱ्या, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, तसेच तंत्रज्ञान व कुशल वैद्यकीय तज्ज्ञ यांची सेवा अकोला व इतर भागांतील रहिवाशांना देण्याचे काम रिलायन्स कॅन्सर केअर सेंटर यापुढेही सुरू ठेवेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
https://www.reliancehospitals.com/akola/