वाणिज्य वार्ता- जेईई मेन्स परीक्षेत समर्थच्या यशाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:23+5:302021-09-19T04:20:23+5:30
एनटीएद्वारे देश व देशाबाहेरील ३३४ शहरांमध्ये १२५ परीक्षा केंद्रांवर घेतलेल्या जेईई-मेन्स या परीक्षेत देशातील ९ लाख ३९ हजार ८ ...
एनटीएद्वारे देश व देशाबाहेरील ३३४ शहरांमध्ये १२५ परीक्षा केंद्रांवर घेतलेल्या जेईई-मेन्स या परीक्षेत देशातील ९ लाख ३९ हजार ८ विद्यार्थी सहभागी झाले होते. उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी ही पात्रता परीक्षा घेण्यात येते. त्यात श्री समर्थ कोचिंग क्लासेसचे अनुज खेकडे, अभिषेक जांगीड आणि अभिषेक नेमाडे यांनी घवघवीत यश मिळविले.
श्री समर्थ कोचिंग क्लासमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिले जाते, देशपातळीवरील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी विशेष बॅचेस, भरपूर सराव परीक्षा, सुसज्ज ग्रंथालय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रा. नितीन बाठे यांचा विद्यार्थ्यांशी असलेला सुसंवाद आणि घरगुती वातावरण जपल्याने आपल्याला हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0000000000000000
गणित आणि भौतिकशास्त्र शिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर - प्रा. नितीन बाठे
जेईई-मेन्स परीक्षा विद्यार्थ्यांना कठीण वाटू नये यासाठी सुरुवातीपासूनच आमच्या संस्थेत तयारी करवून घेतली जाते. विद्यार्थ्यांचे शंकानिरसन, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासाला पोषक वातावरण आणि गणित आणि भौतिकशास्त्र विषय शिकविण्यासाठी अमलात आणलेली आगळीवेगळी पद्धत यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास कठीण गेले नाही. त्याचाच परिणाम या परीक्षेत दिसला.
- प्रा. नितीन बाठे
फोटो - १ अभिषेक जांगीड.जेपीजी
२ अनुज खेकडे.जेपीजी
३ अभिषेक नेमाडे.जेपीजी