घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर; दोघांना अटक
By Admin | Published: February 8, 2016 02:34 AM2016-02-08T02:34:49+5:302016-02-08T02:34:49+5:30
चायनिज खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई; घरगुती सिलिंडर जप्त.
अकोला : सिव्हिल लाइन मार्गावरील चायनिज खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करीत घरगुती सिलिंडर जप्त केले. यावेळी दोघांना अटक करण्यात आली. सिव्हिल लाइन मार्गावर अक्षय रामगोपाल बहुराशी (रा. माळीपुरा) आणि दुर्गेश रामनारायण बहुराशी (रा. आकोट फैल) हे दोघे हातगाडीवर चायनिज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यासाठी ते घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने शनिवारी रात्री ११.१५ वाजता सिव्हिल लाइन पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एका सिंलिडरसह पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली.