जबरी चाेरीच्या गुन्हयाचा स्वताच रचला बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रकार उघड

By सचिन राऊत | Published: August 4, 2023 05:27 PM2023-08-04T17:27:11+5:302023-08-04T17:27:18+5:30

अकाेला : पिंजर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील दाेनद येथून दुचाकीने जात असतांना एका इसमाने अडवून माेबाइलवर एक फाेन करण्याची विनंती ...

Commit the crime of forcible rape; Investigation by the local crime branch revealed the case | जबरी चाेरीच्या गुन्हयाचा स्वताच रचला बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रकार उघड

जबरी चाेरीच्या गुन्हयाचा स्वताच रचला बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात प्रकार उघड

googlenewsNext

अकाेला : पिंजर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील दाेनद येथून दुचाकीने जात असतांना एका इसमाने अडवून माेबाइलवर एक फाेन करण्याची विनंती केल्याचे कारण सांगत ३२ हजार रुपयांची लुटमार केल्याचा बनाव कान्हेरी सरप येथील युवकाने केल्यानंतर या खाेटया गुन्हयाचा पर्दाफाश स्थानीक गुन्हे शाखेच्या तपासात शुक्रवारी उघडकीस आला़

कान्हेरी सरप येथील रहीवासी निवृत्ती महादेव बाेळे वय २५ वर्ष रा़ कान्हेरी सरप हा युवक दुचाकीने पिंजर मार्गे मुर्तीजापूरकडे जात असतांना दाेनदजवळ एका इसमाने त्यांना थांबवीले़ त्यानंतर संबधित इसमाने दाेन फाेन करण्याची विनंती बाेळे यांच्याकढे केली़ बाेळे यांचा फाेन घेउन दाेन फाेन केल्यानंतर या अज्ञात इसमाने बाेळेकडील तब्बल ३२ हजार रुपये व साहित्य लंपास केल्याची घटना २ ऑगस्ट राेजी घडल्याची तक्रार पिंजर पाेलिस ठाण्यात दिली हाेती़ यावरुन पिंजर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयाविरुध्द लुटमारीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला़

या प्रकरणाचा तपास स्थानीक गुन्हे शाखेनेही केला असता संबधित अज्ञात इसमाचा शाेध सुरु केला़ मात्र घटनास्थळाजवळ स्थानीक गुन्हे शाखेने कसून चाैकशी केली असता तसेच फीर्यादी निवृत्ती बाेळे यांना घटनेची पुर्ण माहीती वारंवार विचारल्यानंतर तफावत आढळल्याने पाेलिसांना या चाेरीमध्ये संशय असल्याचे दिसून आले. त्यानंतर लुटमार प्रकरणातील फीर्यादी निवृत्ती बाेळे यांची स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांनी चाैकशी केली असता त्याने असा गुन्हा घडलाच नसल्याची माहीती देत ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी खर्च झाल्याने चाेरीचा बनाव केल्याची कबुली दिली़ यावरुन पाेलिसांनी हा खाेटा गुन्हा उघडकीस आणला़ या प्रकरणाचा तपास पाेलिस अधीक्षक संदिप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मुकुंद देशमूख, गाेपाल जाधव, महेंद्र मलीये, अविनाश पाचपाेऱ, विशाल माेरे, प्रशांत कमलाकर यांनी केला़

Web Title: Commit the crime of forcible rape; Investigation by the local crime branch revealed the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.