खासगी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास वचनबद्ध - डॉ. रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:59 PM2019-03-06T13:59:32+5:302019-03-06T13:59:43+5:30
अकोला: खासगी शाळांमधील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्राधान्य दिले. शासनदरबारीसुद्धा शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. भविष्यातसुद्धा खासगी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले.
अकोला: खासगी शाळांमधील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी प्राधान्य दिले. शासनदरबारीसुद्धा शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. भविष्यातसुद्धा खासगी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले.
राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचे रविवारी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अंजली आंबेडकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील, माजी महापौर सुमन गावंडे, प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, पुष्पा इंगळे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकार, शिक्षक आघाडीचे विभाग अध्यक्ष सैयद राजीक, जिल्हाध्यक्ष गजेंद्र काळे, शिक्षक सेनेचे अध्यक्ष नरेंद्र लखाडे, शिक्षक परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश डवले, साबीर कलाम, खासगी शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनिष गावंडे आदी होते.
यावेळी प्रा. अंजली आंबेडकर यांनी, शासनाचे धोरण हे शिक्षण आणि शिक्षक विरोधी आहे. त्यासाठी शिक्षकांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सध्या गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासन शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आपण सदैव शिक्षकांच्या पाठिशी उभे आहोत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असून, प्रसंगी शिक्षकांसाठी राजीनामासुद्धा देण्यास तयार असल्याचे मत मांडले. अधिवेशनामध्ये शैक्षणिक व शिक्षकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. अधिवेशनाला नीलेश पिंपळकर, अतिक उल रहेमान, अल्केश खेंडकर, मोहम्मद जावेदुजम्मा, प्रमोद गाठे, तारासिंग राठोड, अविनाश मते, गजानन सवडतकर, सुवर्णा वरोकार, प्रतिभा शिरभाते, रजनी अरबाळ, स्वप्नाली पिंपळकर, वसिम मुजाहिद, नरेंद्र चिमणकर, दत्ता अमानकर, चंद्रशेखर बेलमकर, अझीमुद्दीन राही, शेख झाकीर, अमोल वानखडे, नितीन दिवनाले, संतोष गावंडे, मो. खालीद, संदेश अरबट, मो. सोहेल, अनिल कवळकार, प्रवीण साबळे, विशाल सिरसाट, राहुल कोरडे, गोपाल लाखे, सचिन लाखे, श्रीकांत पाथ्रीकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)