अवैध सावकारीच्या चौकशीसाठी समिती होणार गठित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 12:09 PM2020-02-09T12:09:03+5:302020-02-09T12:09:09+5:30
सखोल चौकशी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत चौकशी समिती गठित करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील हुंडीचिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी दोन दिवसांत चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याचे संकेत सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी ८ फेबु्रवारी रोजी दिले.
हुंडीचिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवहारातून जिल्ह्यात शेतकऱ्यांसह किती लोकांची लुबाडणूक होते तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीची पद्धत यासंदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठित करून, चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी २ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्यानुषंगाने जिल्ह्यातील हुंडीचिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत चौकशी समिती गठित करण्यात येणार आहे, असे संकेत जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी ८ फेबु्रवारी रोजी दिले.