दुबार पेरणीच्या खर्चासह हवी नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:35 PM2020-07-07T15:35:12+5:302020-07-07T15:35:28+5:30
दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने, शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. सोयाबीन उगवले नसलेल्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे संबंधित बियाणे कंपन्यांकडून प्रस्तावित असले तरी, बियाणे उगवले नसल्याने पहिल्या व दुसºया पेरणीवर झालेला खर्च लक्षात घेता, दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
राज्यातील विविध भागात पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमधील पंचानामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समित्यांकडून करण्यात येत आहेत. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने, शेतकºयांना दुबार पेरणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘महाबीज’ला देण्यात आले. त्यानुसार सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना बियाणे बदलून देण्याची उपाययोजना महाबीज आणि इतर खासगी बियाणे कंपन्यांकडून प्रस्तावित आहे. केवळ बियाणे बदलून मिळाल्यास, शेतकºयांना एकरी २ हजार ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते; परंतु सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने, शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला एकरी ४ हजार ५०० रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, दुबार पेरणीसाठीही खर्च करावा लागत आहे. त्यानुषंगाने सोयाबीनच्या पहिल्या व दुसºया पेरणीसाठी शेतकºयांचा झालेला एकरी ९ हजार रुपयांचा खर्च विचारात घेऊन, दुबार पेरणीच्या खर्चासह नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
सोयाबीन पेरणीचा असा आहे एकरी खर्च!
सोयाबीन पेरणीसाठी एकरी ४ हजार ५०० रुपये एवढा खर्च आहे. त्यामध्ये सोयाबीन बियाणे २ हजार ५०० रुपये, रासानिक खत १ हजार २०० रुपये, ट्रॅक्टरद्वारे पेरणी ५०० रुपये आणि मजुरी ३०० रुपये इत्यादी खर्चाचा समावेश आहे.
सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसºया पेरणीसाठी शेतकºयांना एकरी ९ हजार रुपये खर्च करावा लागत आहे. दुबार पेरणीपर्यंत शेतकºयांचा झालेला खर्च लक्षात घेता, शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
- शिवाजीराव भरणे
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.
सोयाबीन बियाणे उगवले नसलेल्या शेतकºयांना केवळ बियाणे बदलून न देता, बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीसाठी करावा लागलेला खर्च विचारात घेऊन शेतकºयांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.
- विजय चतरकर
शेतकरी, कापशी, ता. अकोला.