कृषी शिक्षणात स्पर्धा वाढली! - कुलगुरू

By admin | Published: February 5, 2017 02:05 AM2017-02-05T02:05:06+5:302017-02-05T02:34:36+5:30

आज कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ; २,५९३ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी, २६ विद्यार्थी सुवर्ण, १४ रौप्यपदकाचे मानकरी

Competition in agricultural education increased! - Vice Chancellor | कृषी शिक्षणात स्पर्धा वाढली! - कुलगुरू

कृषी शिक्षणात स्पर्धा वाढली! - कुलगुरू

Next

अकोला, दि. ४- कृषी शिक्षणाचा स्तर उंचावला असून, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची स्पर्धा वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रि येत ९८ टक्के गुणधारक विद्यार्थ्यांची स्पर्धा होती. या क्षेत्रात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना नोकरी, रोजगाराच्या संधी यातून प्राप्त होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या पदवीदान समारंभातून निरनिराळ्या कृषी अभ्यासक्रमाचेअडीच हजारांच्यावर विद्यार्थी पदवी ग्रहण करणार असल्याची माहिती शनिवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी दिली. यावर्षीच्या दीक्षांत समारभांत २६ सुवर्ण आणि १४ रौप्यपदके प्रदान केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्वाधिक जागा तबसुम मकबुल या एमएसस्सीची विद्यार्थी सहा सुवर्णपदकांची मानकरी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभाची माहिती देण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शेतकरी सदनातील कृषी जागर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी डॉ. व्ही.एम. भाले, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे आदींची उपस्थिती होती.
भविष्यात जैवतंत्रज्ञान युग असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जैवतंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. याअगोदर कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. असे अनेक नवे अभ्यासक्रम आता येत आहेत. या क्षेत्रात उत्तम ऊर्जाचे कृषी शास्त्रज्ञ तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षीच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्याचे कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर भूषविणार असून, मुबंई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे प्रमुख असतील, ते दीक्षांत भाषण करतील. मणिपूरच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन. पुरी यांच्यासह या कृषी विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू तसेच महाराष्ट्र पशुधन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तामस भट्टाचार्य, कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. स्वागतपर भाषण व अहवाल वाचन मी स्वत: करणार असल्याचे डॉ. दाणी यांनी सांगितले.
२,५९३ पैकी १,८१६ विद्यार्थी प्रत्यक्ष दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून पदवी ग्रहण करणार आहेत. यामध्ये कृषी विद्याशाखेत कृषी पदवीचे १,७७४,उद्यान विद्या १२९, वन विद्या ३१,कृषी जैवतंत्रज्ञान ६६,कृषी व्यवसाय व्यवस्थापन ४५, बीटेक अन्नशास्त्रचे ७७ विद्याथी आहेत.बीटेक कृषी अभियांत्रिकीचे ९३, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एमएससी कृषी २६१,उद्यान विद्या ३६,वनविद्या १0,एमटेक कृषी २२,एमबीए कृषी २१ इत्यादींचा समावेश असून, २८ विद्यार्थ्यांंना आचार्य (पीएचडी)पदवी प्रदान केली जाणार आहे.
- आगा तबसुमला सहा सुवर्ण
यावर्षी एमएससीची आगा तबसुम मकबुल ही नागपूर कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सहा सुवर्णपदाची मानकरी ठरली आहे, तर अकोला कृ षी महाविद्यालयाचा एमएससीचा विद्यार्थी विकास रामटेके तीन सुवर्ण,आदित्य घोगरे तीन तर मंजित प्रेम याला दोन सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. इतरही रोख व पुस्तक स्वरूपात पारितोषिके आहेत.
- २८ पदवीधर झाले शास्त्रज्ञ
यावर्षी २८ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी देण्यात येणार आहे. हे विद्यार्थी पीएचडी प्राप्त करू न कृषी शास्त्रज्ञ होतील.
जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे होणार उद्घाटन
कृषी विद्यापीठांतर्गत यवतमाळ येथे जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाची इमारत बांधून तयार आहे. राज्यपाल के. विद्यासागर राव हे जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे उद्घाटन करणार असल्याची माहितीही कुलगुरू डॉ. दाणी यांनी दिली.

Web Title: Competition in agricultural education increased! - Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.