तक्रारकर्त्याने मागितली आत्मदहनाची परवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:19 AM2021-02-10T04:19:12+5:302021-02-10T04:19:12+5:30

आस्टुल येथे घरकुले न बांधता सरपंच, सचिव, गृहनिर्माण इंजिनिअर व विस्तार अधिकारी यांनी लाभार्थींना बिले काढून दिल्याची प्रथम ...

Complainant seeks permission for self-immolation! | तक्रारकर्त्याने मागितली आत्मदहनाची परवानगी!

तक्रारकर्त्याने मागितली आत्मदहनाची परवानगी!

Next

आस्टुल येथे घरकुले न बांधता सरपंच, सचिव, गृहनिर्माण इंजिनिअर व विस्तार अधिकारी यांनी लाभार्थींना बिले काढून दिल्याची प्रथम तक्रार ३ सप्टेंबर २०१९ रोजी ग.वि.अ. पातूर यांच्याकडे केली होती. त्यानंतर चाैकशी झाली; परंतु दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. २ जून २०२० रोजी ग.वि.अ. यांना स्मरणपत्र दिले. त्यानंतर मु.का.अ. यांच्याकडेही तक्रार दिली. दोषीवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे २१ सप्टेंबर २०२० पासून ४ दिवस पं.स. समोर उपोषणास बसलो. २४ सप्टेंबर रोजी ग.वि.अ. यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मी उपोषण मागे घेतले; परंतु दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. वि.अ. यांनी यामध्ये आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप इंगळे यांनी तक्रारीत केला आहे. तरी संबंधित दोषीवर कारवाई करावी अथवा मला आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी मागणी धम्मपाल इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केले आहे.

Web Title: Complainant seeks permission for self-immolation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.