चोरीस गेलेला ८० लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 11:04 AM2020-08-30T11:04:21+5:302020-08-30T11:04:31+5:30
८० लाख १५ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे.
अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या चोरी तसेच विविध घटनेतील रोख रक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी विशेष उपक्रम राबवून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादींना तब्बल ८० लाख १५ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त केला आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे.
यामध्ये हातीला सा पो.स्टे.स्तरावर १४ लाख ८४ हजार रुपये किमतीचे २७ चोरीस गेलेली वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच १० लाख ९७ हजार रुपयांचे ८८ मोबाईल परत करण्यात आले आहे. १७ लाख ७० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. हा असा एकूण ४५ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तो परत करण्यात आला आहे.
कोतवाली पोलिसांनी केले १० लाख परत
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोऱ्या, वाहन चोरी व सोन्या-चांदीचे दागिने चोरी प्रकरणात हा मुद्देमाल जप्त करून सदरचा मुद्देमाल डॉ. दीपक मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आला. यामध्ये पाच लाख ५६ हजार रुपये किमतीचे ३६ मोबाइल, एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी व रोख दोन लाख ९० हजार रुपये असा एकूण १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला आहे. सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत केला.