बार्शीटाकळी तालुक्यात शेतरस्त्याच्या दोनशेच्यावर तक्रार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:51+5:302021-06-16T04:26:51+5:30

यापूर्वी कधीच नाही, एवढ्या रस्ता, नाला, धुरा, यासंदर्भात संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यातून दोनशेच्यावर शेतकऱ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वांत जास्त ...

Complaint on 200 farm roads in Barshitakali taluka! | बार्शीटाकळी तालुक्यात शेतरस्त्याच्या दोनशेच्यावर तक्रार !

बार्शीटाकळी तालुक्यात शेतरस्त्याच्या दोनशेच्यावर तक्रार !

Next

यापूर्वी कधीच नाही, एवढ्या रस्ता, नाला, धुरा, यासंदर्भात संपूर्ण बार्शीटाकळी तालुक्यातून दोनशेच्यावर शेतकऱ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्वांत जास्त तक्रारी जून महिन्यात आल्या असून, आधीच्या तक्रारीची सुनावणी सुरू आहेत. बऱ्याच प्रकरणाचा निपटारा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, तडजोड करून केला आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. यापूर्वी रस्ता होता, मात्र आता नाही. धुरा कोरला, बांध फोडला, वर्ग २ किंवा समाजकल्याण विभागामार्फत मिळालेल्या शेतजमिनींमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ताच नाही, अशा तक्रारी पिंजर सर्कलमधून प्राप्त झाल्या आहेत.

जागेवर तक्रारींचा निपटारा करण्याकडे प्राधान्य

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार शेतकऱ्यांशी संवाद साधुन, त्यांच्या गावात जाऊन चौकशी करून शक्यतोवर जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र ज्या प्रकरणाचा निर्णय झाला नाही, त्याच्या सुनावणी सुरू आहेत.

जून महिन्यातच अधिक तक्रारी

जून महिन्यातच अधिक तक्रारी जून महिन्यातच अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रत्येक दिवशी शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे काम सुरू आहे. अनेक प्रकारचे वाद, विवाद, तक्रारी प्राप्त होत असून, रस्त्याच्या दोनशेच्यावर तक्रारी बार्शीटाकळी तालुक्यातून विशेषतः पिंजर सर्कलमधून प्राप्त झाल्या आहेत. त्याचा निपटारा करण्याचे काम सुरू आहे, असे तहसीलदार गजानन हामंद यांनी सांगितले.

Web Title: Complaint on 200 farm roads in Barshitakali taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.