नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार

By admin | Published: May 23, 2014 08:00 PM2014-05-23T20:00:06+5:302014-05-24T01:09:15+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली गावातील पात्र लाभार्थींना अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

Complaint to exclude from the list of victims | नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार

नुकसानग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील कार्ली गावातील पात्र लाभार्थींना अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून वगळल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात वादळी वार्‍यासह पाऊस व अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. याला तालुक्यातील कार्ली गावही अपवाद नव्हते. तलाठ्यांनी संबंधित गावांचा सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. या अहवालानुसार नुकसानीच्या मदतीसाठी पात्र ठरलेल्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कार्ली येथील नुकसानग्रस्तांच्या याद्यात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. ज्या शेतकर्‍यांचे खरोखर नुकसान झाले नेमके त्याच शेतकर्‍यांची नावे या यादीत नसल्यामुळे तलाठ्याप्रती रोष निर्माण होत आहे. या प्रकाराची चौकशी करून शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार मूर्तिजापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

Web Title: Complaint to exclude from the list of victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.