सांगवी गट ग्रामपंचायतीचे सचिव व पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:19 AM2021-05-18T04:19:14+5:302021-05-18T04:19:14+5:30
ग्रामपंचायतीला परवानगी नसताना व ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसताना, अकोट-अकोला रोड वल्लभनगर फाट्याजवळील एकूण १८० चौरस फूट खुली जागा लघु ...
ग्रामपंचायतीला परवानगी नसताना व ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसताना, अकोट-अकोला रोड वल्लभनगर फाट्याजवळील एकूण १८० चौरस फूट खुली जागा लघु व्यवसायाकरिता भाड्याने देण्याचे प्रयोजन केले. तसेच लोकांकडून ग्रामपंचायतीने अनामत रक्कम स्वीकारली. श्यामसुंदर शर्मा यांच्याकडून सामान्य पावती क्रमांक ४५ नुसार २५ हजार रुपये, ताठेकडून १५ हजार रुपये, राठोड यांच्याकडून १५०० रुपये भरले. पैसे भरून ९ महिने झाले तरीही ग्रामपंचायतीने त्यांना जागा उपलब्ध करून दिली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रोडची जागा दाखवून ग्रामपंचायतीने त्यांची फसवणूक केली. त्यामुळे शर्मा, ताठे व राठोड यांनी अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती, पालकमंत्री, सरपंच सांगवी खु. यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवावे या उद्देशाने ठराव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे जागेच्या मंजुरीसाठी पाठविला.
- अंजली विवेक गावंडे, सरपंच सांगवी खु.
ग्रामपंचायतीने जागा भाडेतत्त्वावर दिली की नाही याचा ग्रामपंचायतीमध्ये रेकॉर्ड पाहून सांगतो.
-हिंमत राठोड, ग्राम सचिव