जिल्ह्यात आज संपूर्ण संचारबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:34 AM2021-02-21T04:34:49+5:302021-02-21T04:34:49+5:30

अकोला: कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर बघता, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दर रविवारी जिल्हयात संपूर्ण संचारबंदी लागू ...

A complete curfew in the district today! | जिल्ह्यात आज संपूर्ण संचारबंदी!

जिल्ह्यात आज संपूर्ण संचारबंदी!

googlenewsNext

अकोला: कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर बघता, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी दर रविवारी जिल्हयात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार रविवार, २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. संपूर्ण संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र जमता येणार नाही. जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्यानंतर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुढील आदेशापर्यंत दर रविवारी जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार रविवार, २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. संपूर्ण संचारबंदीच्या कालावधीत मुक्त संचार करता येणार नाही. त्यानुषंगाने संपूर्ण संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयारी करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत

ही सेवा राहणार सुरु!

संचारबंदीच्या कालावधीत शासकीय व खासगी ॲम्ब्युलन्स सेवा, रात्रीच्या वेळी सुरु राहणारी औषधांची दुकाने, ठोक भाजीपाला विक्री , दूध व दुग्धजन्य पदार्थ वक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वे तसेच एसटी बस व खासगी लक्झरीने प्रवास करुन उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा, राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप व ढाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग इत्यादी सेवा सुरु राहणार आहेत.

Web Title: A complete curfew in the district today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.