मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश

By संतोष येलकर | Published: April 20, 2023 06:54 PM2023-04-20T18:54:49+5:302023-04-20T18:55:02+5:30

मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Complete incomplete development works in backward communities within seven days Directions in Zilla Parishad Social Welfare Committee meeting | मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश

मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे सात दिवसांत पूर्ण करा; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत निर्देश

googlenewsNext

अकोला : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या (मागासवर्गीय ) वस्त्यांचा विकास योजनेंतर्गत जिल्हयातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अपूर्ण विकासकामे येत्या सात दिवसांत पूर्ण करुन, प्रस्तावित नवीन विकासकामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्हयात सुरु असलेली आणि अपूर्ण असलेल्या विकासकामांचा तालुकानिहाय आढावा या सभेत घेण्यात आला.

 मागासवर्गीय वस्त्यांमधील सुरु असलेली आणि अपूर्ण असलेली विकासकामे सात दिवसांच्या कालावधीत पूर्ण करुन, नवीन कामांचे नियोजन करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या. जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध याेजनांच्या मुद्दयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य तथा सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, राम गव्हाणकर, निता गवइ, माया कावरे, वंदना झळके, लीना शेगोकार, सुनील सरदार यांच्यासह समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कामांच्या ठिकाणी माहिती फलक लावा 
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास योजनेंतर्गत जिल्हयात विकासकामे सुरु करताना व कामे पूर्ण झाल्यानंतर कामांच्या ठिकाणी योजनेचे नाव, कामाचे नाव, संबंधित जिल्हा परिषद सदस्याचे नाव, कामाची अंदाजित रक्कम आदी प्रकारच्या माहितीचे फलक लावण्याची सूचना सदस्य राम गव्हाणकर यांनी सभेत मांडली. त्यानुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

Web Title: Complete incomplete development works in backward communities within seven days Directions in Zilla Parishad Social Welfare Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला