तीनही बड्या सराफा प्रतिष्ठानांची तपासणी पूर्ण

By admin | Published: January 21, 2017 02:56 AM2017-01-21T02:56:45+5:302017-01-21T02:56:45+5:30

आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

Complete the inspection of the three largest bullion establishments | तीनही बड्या सराफा प्रतिष्ठानांची तपासणी पूर्ण

तीनही बड्या सराफा प्रतिष्ठानांची तपासणी पूर्ण

Next

अकोला, दि. २0-नोटाबंदी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत सोन्याच्या दागिन्यांसह सोन्याच्या बिस्किटांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करणार्‍या अकोल्यातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांची आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी तपासणी पूर्ण केली. तब्बल ३0 अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या पथकाने तीन दिवसांत गांधी चौकातील केजे स्क्वेअर (खंडेलवाल ज्वेलर्स), खंडेलवाल अलंकार केंद्र आणि विश्‍वकर्मा ज्वेलर्सची संशयावरून तपासणी केली. बुधवारपासून सुरू असलेली तीनही ज्वेलर्स प्रतिष्ठानांची तपासणी तीन दिवसांनंतर शुक्रवारी पूर्ण झाली.

Web Title: Complete the inspection of the three largest bullion establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.