जात वैधता प्रस्ताव पडताळणी पूर्ण
By Admin | Published: July 6, 2014 12:35 AM2014-07-06T00:35:16+5:302014-07-06T00:45:04+5:30
३ हजार ४00 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार
अकोला : जिल्हय़ातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल करण्यात आलेल्या परिपूर्ण प्रस्तावांची पडताळणी अकोल्याच्या विभागीय जात पडताळणी समितीमार्फत पूर्ण करण्यात आली असून, ३ हजार ४00 विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत.
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियासह विविध शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंकडून दाखल करण्यात आलेल्या अकोला जिल्हय़ातील ३ हजार ४00 विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण प्रस्तावांची पडताळणी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून पूर्ण करण्यात आली.
४ जुलैपर्यंंत या सर्व विद्यार्थ्यांंचे जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत. ओळखपत्र सादर केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांंना जात वैधता प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांंची विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी धामधुम सुरु आहे. जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.