नेरधामणा बॅरेजचे काम लवकर पूर्ण करा; पाटबंधारे विभागाची कंत्राटदारास नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 02:26 AM2018-01-13T02:26:35+5:302018-01-13T02:28:02+5:30
अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत या प्रकल्पाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत या प्रकल्पाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. ठरलेल्या कालावधीत ही कामे पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कंत्राटदारास नोटीस बजावली असून, तसे न केल्यास काम काढून घेण्याचा इशारा या नोटीसमधून देण्यात आला.
या बॅरेजचे ८0 टक्के काम पूर्ण झाले. २0१७ मध्ये बॅरेजचे बांधकाम पूर्ण होणार होते; पण सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने या बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल संजीवनी योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाल्याने काम सुरू करण्यात आले आहे. सध्या पंपाचे काम सुरू आहे. आता वक्रद्वाराचे काम करायचे आहे. त्यासाठी कंत्राटदरास वेळ देण्यात आला आहे. त्या वेळेत वक्रद्वार (गेटचे) काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने कलम १0२ अन्वये कंत्राटदारास नोटीस बजावली आहे.
नेरधामणाचे बॅरेजचे काम सुरू आहे. हे काम विहित वेळेत करण्याची कंत्राटदारास सूचना केली. आता या बॅरेजला गेट लावण्यात येणार आहे. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावे, अशी ही कलम १0२ अन्वये नोटीस आहे. वेळेत काम न झाल्यास काम काढून घेण्यात येईल.
- जयंत शिंदे,
कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.