तुरीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:03 AM2017-08-04T02:03:04+5:302017-08-04T02:03:50+5:30
अकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.
शासनाच्या अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी गत १0 जूनपासून बंद करण्यात आली.
त्यानंतर खरेदी केंद्रांवर गत ३१ मेपर्यंंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय गत २१ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्टपर्यंंत तूर खरेदी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील १४ हजार ५२४ शेतकर्यांची ३ लाख ५२ हजार क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया २६ जुलैपासून जिल्हय़ातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे.
टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांची तूर खरेदीची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंंत पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांच्या घरोघरी जाऊन तलाठी व कृषी सहायकांनी तुरीचे पंचनामे करण्याचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकारी उपस्थित होते.
सात-बारा ‘अपडेट’ करा!
जिल्हय़ातील शेतकर्यांना १५ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सात-बारा वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीकृत सात-बारातील त्रुटी दुरुस्त सात-बारा तातडीने ‘अपडेट’ करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले.
पंचनाम्याचे होणार परीक्षण!
तूर खरेदीसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्याचे परीक्षण नायब तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे, तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून ट्रेडर्सची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुरीचे पंचनामे काटेकोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.