बाळापूर शहरात नागरिकांकडून निर्बंधांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:17+5:302021-05-11T04:19:17+5:30
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. कोरोनाला ...
शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. कोरोनाला हरविण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली; परंतु ही मोहीम संथगतीने सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अकोला, शेगाव व इतर ठिकाणचे नागरिक लसीकरणासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रविवारी बाळापुरात मोठी गर्दी झाली होती; परंतु सोमवार सकाळपासून रस्त्यांवरील तुरळक गर्दी वगळता फारसी वर्दळ दिसून आली नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष सै. ऐनोदीन खतीब व मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी केले आहे.
फोटो: