तडजोडीचा धनादेश अनादर आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:06 PM2017-10-11T14:06:04+5:302017-10-11T14:06:14+5:30

Compromise Check | तडजोडीचा धनादेश अनादर आरोपीस अटक

तडजोडीचा धनादेश अनादर आरोपीस अटक

Next



अकोला : धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयासमोर रक्कम देण्याची तडतोड झाल्यानंतर तडजोडीतील रक्कम अदा करण्यासाठी दिलेला धनादेश पुन्हा अनादरित झाल्यामुळे तसेच न्यायालयाचे समन्स न स्वीकारणाºया एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. प्रथमश्रेणी न्यायालयाने गिरीश मंत्री नामक या आरोपीस १६ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
गोपाल अग्रवाल, अंशुल लोहिया व रमेशचंद्र लोहिया या तीनही व्यापाºयांनी गिरीश मोतीलाल मंत्री याला प्रत्येकी ७५ हजार रुपयांची रक्कम कामकाजासाठी दिली होती. ही रक्कम परत करण्यासाठी गिरीश मंत्री याने तीनही व्यापाºयांना धनादेश दिला होता. या तीनही व्यापाºयांनी रक्कम परत मिळविण्यासाठी सदर धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिला असता तो अनादरित झाला. त्यामुळे या तीनही व्यापाºयांनी गिरीश मंत्री याच्याविरुद्ध कलम १३८ नुसार न्यायालयात दावा दाखल केला. सदर धनादेश अनादरचे प्रकरण सुरू असतानाच आरोपी व तक्रारकर्ते यांच्यात न्यायालयासमोर तडजोड झाली. तीनही व्यापाºयांची व्याजासह रक्कम ८ लाख २५ हजार रुपये देण्याचे आरोपी गिरीश मंत्री याने न्यायालयासमोर मान्य करीत तसा धनादेश दिला. सदरचा धनादेश या तीन व्यापाºयांनी बँकेत वटविण्यासाठी दिला असता हा तडजोडीचा धनादेशही अनादरित झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन गिरीश मंत्री याच्यावर कारवाईची मागणी केली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए. बी. रेलकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असता आरोपी हजर झाला नाही.त्यामुळे न्यायालयाने समन्स बजावले; मात्र ते गिरीश मंत्री याने स्वीकारलेच नाही. हा खटाटोप सुरू असतानाच न्यायालयाने गिरीश मंत्री याच्याविरुद्ध गैरजमानती वॉरंट काढला. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी मंत्री याला मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गिरीश मंत्री याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला १६ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी फिर्यादी व्यापाºयांच्यावतीने अ‍ॅड. मनोज अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Compromise Check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.