अकोट येथे वीज बिलाची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:18 AM2021-02-12T04:18:26+5:302021-02-12T04:18:26+5:30

बेळगाव येथे क्षुल्लक वादातून मारहाण अकोट: बळेगाव येथे क्षुल्लक वादातून हाणामारी होऊन सहा जण जखमी झाले. अमोल कैलास डाबेराव, ...

Compulsory electricity bill at Akot | अकोट येथे वीज बिलाची सक्ती

अकोट येथे वीज बिलाची सक्ती

Next

बेळगाव येथे क्षुल्लक वादातून मारहाण

अकोट: बळेगाव येथे क्षुल्लक वादातून हाणामारी होऊन सहा जण जखमी झाले. अमोल कैलास डाबेराव, कैलास रायसिंग डाबेराव, जयश्री अंकुश राठोड, दुसऱ्या गटातील श्याम अवधूत दाभाडे, किरण दयानंद गायकवाड, बेबी अवधूत दाभाडे यांच्या क्षुल्लक वादातून बुधवारी हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी परस्परांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

वृक्षतोड प्रकरणी वनविभागाची कारवाई

पातूर: पातूर वनपरिक्षेत्रात पातूर येथील रहिवासी सै. नाजीर सै. महेबुब याच्यासह आणखी एकजण सागवान वृक्ष तोडत होते. वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना, सै. नाजीर यास पडकले. दुसरा आरोपी फरार झाला. त्यांच्याविरूद्ध पातूर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

मुरूमाची अवैध वाहतूक, ट्रक जप्त

अकोट: महसूल विभागाने मुरूमाची अवैध वाहतूक ट्रक बुधवारी पकडला. एमएच १६ सीए ०२३२ क्रमांकाच्या ट्रकमधून मुरूमाची अवैध वाहतूक करण्यात येत होती. महसूल विभागाने ट्रक जप्त करून अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिला.

हरभऱ्याच्या उत्पादनात घट

आलेगाव: हरभरा सोंगणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी हरभरा पिकाची काढणी करीत अहेत. काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे काही भागात चार ते पाच क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन होत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था

बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था झाली असून, मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच रस्त्यावरील धुळीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती करावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिंजर ग्रामपंचायतकडून विकासाची अपेक्षा

पिंजर: ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी झाली. आता नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांकडून ग्राम विकासाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. गावात स्वच्छता, नाल्या, सांडपाणी, पिण्याचे पाणी, पथदिवे आदी समस्या आहेत. या समस्या मार्गी लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

खानापूर: खानापूर परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग आहे. जंगलामध्ये बिबट्यासह माकडे, रोही, हरिण, काळविटांचे वास्तव्य आहे. वन्य प्राणी शेतांमध्ये शिरून पिके फस्त करीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

पीक नुकसानाच्या अनुदानात वाढ करा

अडगाव: वन्य प्राण्यांनी पिकांचे नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळते. परंतु वन विभागाकडून देण्यात येत असलेली नुकसानभरपाईचे अनुदान तुटपुंजे आहे. त्यामुळे नुकसानभरपाई अनुदान वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

चोहोट्टा येथे आठवडी बाजारात अस्वच्छता

चोहोट्टा बाजार: चोहोट्टा बाजार येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. या आठवडी बाजारात आजुबाजूच्या गावांमधील व्यावसायिक, व्यापारी व ग्रामस्थ येतात. बाजार परिसरात कुजलेला भाजीपाला व इतर साहित्य फेकत असल्याने, सर्वत्र अस्वच्छता पसरत आहे. ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे.

चिखलगाव येथे हरभरा काढणीला सुरूवात

चिखलगाव: परिसरात हरभरा काढणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी शेतातील हरभरा सोंगुन थ्रेशरद्वारे हरभरा काढत आहेत. परंतु घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटत असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे हरभऱ्यावर केलेला खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

माना/कुरूम: माना व कुरूम परिसरामध्ये शेतात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कृषी साहित्य चोरीस जात असल्याच्या घटना घडत आहेत. माना पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त वाढवावी. अशी मागणी माना व कुरूम परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

लिंबूला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा

वाडेगाव: वाडेगाव परिसर लिंबूसाठी प्रसिद्ध आहे. गतवर्षी लिंबू पिकाला गारपिट व मुसळधार पावसाने तडाखा दिला होता. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते. यंदा पिकाची परिस्थिती उत्तम आहे. परंतु लिंबू पिकाला चांगला भाव मिळत नाही. तो यंदा मिळावा. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Compulsory electricity bill at Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.