संगणकातील हार्ड डिस्क करणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:48 AM2017-10-24T01:48:21+5:302017-10-24T01:51:01+5:30
अकोला : शासन मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळा प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील ज्या संगणकात नोंद घेण्यात आली आहे, त्या संगणकाची हार्ड डिस्क आर्थिक गुन्हे शाखा जप्त करणार आहे. त्यानंतर ही डिस्क तपासणीसाठी हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासन मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळा प्रकरणात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केल्यानंतर भूमी अभिलेख विभागातील ज्या संगणकात नोंद घेण्यात आली आहे, त्या संगणकाची हार्ड डिस्क आर्थिक गुन्हे शाखा जप्त करणार आहे. त्यानंतर ही डिस्क तपासणीसाठी हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन, हा भू खंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केला. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी व हा भूखंड हडप करणारा २0 कोटी रु पयांचा लाभार्थी यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचण्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तपास अधिकारी गणेश अणे यांना अधिक अधिकार प्राप्त झाले असून, त्यांनी तपासाला गती दिली आहे. भूमी अभिलेख विभागातील सदरचे संगणकातील हार्ड डिस्क जप्त करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून, लवकरच ही डिस्क जप्त करण्यात येणार आहे.
हार्ड डिस्कच्या तीन प्रती
भूमी अभिलेख विभागातील संगणकातील हार्ड डिस्क जप्त केल्यानंतर त्यामधील आक्षेपार्ह मजकूर व अन्य मजकूर कायम राहावा म्हणून तीन हार्ड डिस्कमध्ये हा मजकूर कॉपी करण्यात येणार आहे. त्यानंतर एक प्रत तपास अधिकारी, दुसरी प्रत भूमी अभिलेख विभाग, तर तिसरी प्रत तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठविण्यात येणार आहे.
पाच ते सहा भूखंडांचा घोळ
भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी व एका नगरसेविकेचा प ती या दोघांनी पाच ते सहा शासकीय भूखंडांचा घोळ घातल्याची माहिती आहे. यामधील एका भूखंडाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पार पडल्याची माहिती असून, सदरचा भूखंड अग्रवाल नामक व्यापार्याला २0 लाखांची खरेदी किंमत दाखवून विकण्यात आला आहे.