संगणकीय सात-बाराचे तीनतेरा
By admin | Published: June 28, 2014 10:37 PM2014-06-28T22:37:33+5:302014-06-28T22:40:08+5:30
सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.
बुलडाणा : राज्याच्या महसूल विभागात सध्या ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकर्यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.
संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे तहसीलदारांचे एक वषार्पुवीच सर्व तलाठय़ांना आदेश दिले.
मात्र अनेक तालुक्यातील विविध भागात आजही हस्तलिखीतातील सात-बारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकर्यांना तासंतास तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागते. एका तलाठय़ांकडे अनेक गावांची सूत्रे असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकर्यांनाची गर्दी वाढत आहे. शासन आपल्या दारी असा नारा प्रशासन देत असला तरी शेतकर्यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरु आहे. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकर्यांना तलाठय़ाच्या दारी हेलपाटे मारावे लागतात. तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकर्यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे.