निवडणूक शपथपत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 10:23 AM2021-07-05T10:23:58+5:302021-07-05T10:24:25+5:30

Conceals criminal background in Election affidavit : शपथ पत्रात गुन्हे दाखल असल्याचे लपवून ठेवल्याने शहर पोलीसांनी त्यांच्या विरुद्ध २ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

Conceals criminal background in Election affidavit; Filed a case against Hatgaon Sarpanch | निवडणूक शपथपत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणूक शपथपत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

मूर्तिजापूर : तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकदरम्यान हातगाव सरपंच अक्षय राऊत यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी शपथ पत्रात गुन्हे दाखल असल्याचे लपवून ठेवल्याने शहर पोलीसांनी त्यांच्या विरुद्ध २ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.

  २०२० मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान अक्षय जितेंद्र राऊत यांनी प्रभाग ५ मधून ग्रामपंचायत सदस्या करीता २४ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी नामनिर्देशनपत्रासोबत त्यांचे शपथपत्र सुध्दा जोडले होते. सदर शपथ पत्रात उमेदवाराची गुन्हेगारी पाश्र्वभूमी संबधी माहिती विचारली होती. त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सरपंच अक्षय राऊत यांनी म्हटले आहे. परंतू त्यांच्यावर ३२४, ५०४, ३४ कलमान्वये शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. या संदर्भात सुरेश पुंडलिक जोगळे यांनी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना तशी तक्रार दाखल केली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी दरम्यान अक्षय राऊत यांनी शपथपत्रात गुन्हेगारी पाश्र्वभूमी दडवली असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन नायब तहसीलदार (निवडणूक) आर एम पांडे यांनी २ जुलै रोजी शहर पोलीसांत रितसर तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरुन हातगावचे सरपंच अक्षय राऊत (२५) यांचे विरूध्द राज्य निवडणूक आयोगाच्या परीपत्रकानुसार १७१ जी, १७७,१८१ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Conceals criminal background in Election affidavit; Filed a case against Hatgaon Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.