अकोल्यातील रस्त्यांची सातासमुद्रापार राहणाऱ्यांना चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:18+5:302021-09-07T04:24:18+5:30

प्रशांत विखे तेल्हारा: गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यासह तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना ...

Concern for those living across the seas of Akola roads! | अकोल्यातील रस्त्यांची सातासमुद्रापार राहणाऱ्यांना चिंता!

अकोल्यातील रस्त्यांची सातासमुद्रापार राहणाऱ्यांना चिंता!

Next

प्रशांत विखे

तेल्हारा: गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यासह तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विकासकामांच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने आता बास वृत्त मालिकेद्वारा रस्त्यांच्या कामांबाबत पोलखोल केली आहे. तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्थेबाबत बातमी प्रकाशित होताच, तेल्हारा येथील मूळचे रहिवासी व सध्या सातासमुद्रापार पश्चिम आफ्रिकेतील रहिवासी रजनीश पोटे यांनी दखल घेतली असून, उच्च न्यायालयात ऑनलाइनद्वारा जनहित याचिका दाखल करण्याचे सांगितले आहे. या सर्व प्रकारांहून जिल्ह्यातील रस्त्यांची आता सातासमुद्रापार राहणाऱ्यांना चिंता असल्याचे दिसून येते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येत नसल्याचे दिसून येत आहे.

तेल्हारा शहरातील रहिवासी असलेले रजनीश पोटे हे नोकरीनिमित्त पश्चिम आफ्रिका येथे राहतात. अजूनही त्यांची गावाशी नाळ जुळली असल्याचे दिसून येत आहे. गावातील सुख-दुःखात ते नेहमीच सहभागी होण्याचा प्रयत्न करतात. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील रस्त्यांची समस्या गंभीर बनली असून, यासाठी अनेकांनी आंदोलने, निवेदने दिली आहेत. मात्र, रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. रस्त्यांवर झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे, तर अनेकांना अपंगत्व आले आहे. या संदर्भात ‘लोकमत’ने दि. ४ सप्टेंबर रोजी बातमी प्रकाशित केली. पश्चिम आफ्रिका येथील रजनीश पोटे यांनी ऑनलाइन माध्यमातून आफ्रिकेत बातमी वाचली. त्यांनी तातडीने दखल घेऊन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला. बातमी पाहून ते उच्च न्यायालयात ऑनलाइनद्वारे रिट याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------------------------

अनेक वर्षांपासून तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बघून वेदना होत आहेत. मी ऑनलाइनद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहितीच्या अधिकारात आतापर्यंत झालेल्या खर्च, पोलीस विभागाकडून रस्त्यांवर घडलेल्या अपघातांची माहिती मागविली आहे.

- रजनीश पोटे, रा. पश्चिम आफ्रिका.

--------------------------------------

Web Title: Concern for those living across the seas of Akola roads!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.