‘अंनिस’च्या संत गाडगेबाबा प्रबोधन पंधरवाड्याचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 06:55 PM2017-12-25T18:55:36+5:302017-12-25T18:57:31+5:30
अकोला: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला जिल्हा महानगरचे वतीने आयोजीत संत गाडगेबाबा प्रबोधन पंधरवाड्याचा शानदार समारोप अकोलखेड येथे संपन्न झाला.
अकोला: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला जिल्हा महानगरचे वतीने आयोजीत संत गाडगेबाबा प्रबोधन पंधरवाड्याचा शानदार समारोप अकोलखेड येथे संपन्न झाला. ६ डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ते २० डिसेंबर गाडगेबाबास्मृती दिना पर्यंत आयोजीत या अभियानात एकशे तिस चमत्कार प्रात्यक्षिका सहित प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले . अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३२ वक्त्यांनी विविध शाळा महाविद्यालयातुन सदर अभियान राबवीले. समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख अशोक घाटे उपस्थित होते बुबाबाजीवर कडक ताशेरे ओढून घाटे यानी चमत्कार प्रात्यक्षिक सह भुत भानामती मंत्र तंत्र देवी अंगात येणे करणी जादूटोणा जारण मारण करणी आदी अंधश्रद्धा कशा फोल आहेत त्याचे विवेचण केले. महिला, युवकांनी मोठ्या संख्येने या चळवळीत सामील व्हावे असे आवाहन अकोला जिल्हा संपर्क प्रमुख शरद वानखडे यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणत्याही देवा धमार्ला विरोध न करता समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करते,असे वानखडे पुढे बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक चंद्रकांत झटाले महानगर संघटक यानी केले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्वप्ना लांडे संध्या देशमुख हरीश आवारे, अॅड . शेषराव गव्हाळे , अॅड अनिल लव्हाळे, धम्मदीप इंगळे,आशा उगवेकर, कौशीक पाठक, पी.जे. राठोड, नरेंद्र इंगळे, अरुण सांगळोदकर, विलास ठोसर, श्यामराव देशमुख, भारत इंगोले, विजय बुरकले, विवेक वाडोकार, नितीन धोरण मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सयोजक घनश्याम दाते याचे हस्ते सर्व अभियानात सहभागी कार्यकर्त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देउन सन्मान करण्यात आला .फुले शाहु आंबेडकर बहुद्येशीय सस्थेचे करुनेश मोहोड प्रविण शेंडे,केशव लांडे,इस्माईल भाइ यांचा रक्तदान केल्याबद्यल सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव समिती अकोलखेडचे ललित नगराळे, प्रभाकर गणभित, हिरामण शेंडे, सुधाकर जांभळे,रामकृष्ण डहाके,सागर चवरे,संदीप चौरागड यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अॅड देवानंद फुसे यानी तर आभार घनश्याम दाते यानी केले.