सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 06:39 PM2020-01-21T18:39:38+5:302020-01-21T18:40:12+5:30

राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.

Conclusions from the Irrigation Council; Will send the recommendations to the government |  सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

 सिंचन परिषदेतील निष्कर्ष; शिफारशी शासनाला पाठविणार

Next

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्यस्तरीय सिंचन परिषदेत पाणी विषयावरील मंथनातून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले असून, या निष्कर्षाची अंमलबजावणी होण्यासाठीची शासनाला शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. यातील अनेक शिफारशींपैकी लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती करण्यासाठी ग्राम पातळीवर मंडळ, समित्या स्थापन करू न लोकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
सिंचन क्षेत्रात वाढ होत असून, सिंचन आयोगाच्या अहवालाच्या आकडेवारीवरू न हे समोर आले आहे. आता प्रति घनमीटर पाण्याची उत्पादकता वाढविणे हे खरे काम आहे. तद्वतच पाणी व्यवस्थापन काळाची गरज आहे. पाण्याची वाढती गरज बघता भुपृष्ठावर जलसाठे वाढवावे लागणार आहेत. तद्वतच मूलस्थानी जलसंवर्धनही करावे लागेल. लोकांचे राहणीमान बदलले असून, पाण्याचा वापर वाढला आहे. शेती, उद्योग आदी विकासाला वर्षाकाठी किती पाणी लागते, याचा ताळेबंद, हिशेब ठेवावा लागणार आहे.
नद्या, ओढे, तलाव आदी ठिकाणी लोकांनी कचरा, घाण टाकणे टाळले पाहिजे, नद्यांच्या काठचे अतिक्रमण काढून नद्यांचा श्वास मोकळा करणे तेवढेच अत्यावश्यक आहे. त्यासाठी लोकांनी पाण्यावर प्रेम करावे, त्यासाठीची जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी शहर ते ग्रामपातळीवर विविध समित्या स्थापन कराव्या, या समित्यांचे संचालन जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमार्फत होणे गरजेचे आहे. व्यापक स्वरू पात जनजागृती होईल. सिंचन आयोगाच्या ताज्या अहवालानुसार सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याचे समोर आले आहे. विदर्भातही यानुषंगाने काम होत आहे; परंतु खरी गरज आहे ती भूपृष्ठावर पावसाचे पाणी साठविण्याची. ती क्षमता आपण निर्माण न केल्याने पावसाचे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे. आजमितीस आपण केवळ ३० टक्के पाण्याचा साठा करू शकलो. यासह आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे. शेतमालाच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असून, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना गती मिळाली. पिकांच्या उत्पादन वाढीसोबतच उपलब्ध पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे काळाजी गरज आहे, कालव्याद्वारे होणाºया सिंचनामध्ये वहन व्यय कमीत कमी व्हावे, त्याकरिता आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून कमी पाण्यामध्ये जास्त सिंचन व्हावे, त्याकरिता कमी पाण्यामध्ये येणाºया पीक पद्धतीचा स्वीकार करणे तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे.
खारपाणपट्टा हा विदर्भाला शाप म्हणतात; परंतु ही निसर्गाची देणगी असून, येथे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास खारपाणपट्ट्याचा हा भूभाग सुजलाम् सुफलाम् होईल. ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणालीत’ (पीडीएन) दोष असल्याने या पद्धतीद्वारे पाणी सोडल्यास शेवटच्या शेतकºयापर्यंत पाणी पोहोचणार नाही. त्यामुळे या प्रणालीतील दोष दूर करावा, लागणार आहे. यावर निष्कर्ष काढण्यात आले असून, या अंमलबजावणीसाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.


 सिंचन परिषदेत पाण्याविषयी दोन दिवस मंथन होऊन महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले. अभ्यासपूर्ण निर्णय झाले. निष्कर्षाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी शासनाला शिफारस करण्यात येणार आहे.
- डॉ. माधवराव चितळे,
आंतरराष्टÑीय जलतज्ज्ञ,
पुणे

 

Web Title: Conclusions from the Irrigation Council; Will send the recommendations to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला