कवठा येथील काँक्रीट रस्त्याचे काम थातुरमातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:52+5:302021-04-23T04:19:52+5:30
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दलितवस्ती सुधार योजनेतून कवठा ग्रामपंचायतीने सिमेंट क्राॅंकीट रस्त्याचे काम सुरू केले आहे. या कामात ...
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दलितवस्ती सुधार योजनेतून कवठा ग्रामपंचायतीने सिमेंट क्राॅंकीट रस्त्याचे काम सुरू केले आहे. या कामात अंदाजपत्रकाप्रमाणे चार इंच रस्ता खोदकाम लेव्हलिंग करणे, ८० एम.एम. खडी व त्यावर मुरूम व पाणी टाकून रोलरने दबाई करणे अपेक्षित आहे. मात्र सदर कंत्राटदाराने रस्ता खोदकाम लेव्हलिंग न करताच, मुरूम व कमी प्रमाणात खडी टाकली. रोलरने दबाई केली नाही. त्यामुळे हे थातुरमातुर काम बंद करावे, अशी मागणी होत आहेे. ज्ञानेश्वर दशरथ घ्यारे यांचे घराजवळ सांडपाणी वाहून जाण्याकरिता आडवा पाइप किंवा रपटा टाकावा व काम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्याची मागणी उपसरपंच सुजाता योगेश घ्यारे, सदस्य श्रीकांत चव्हाण, सदस्य शारदा बोरचाटे यांनी केली आहे.
याबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.के. राठोड यांच्या संपर्क साधला असता, त्यांनी कवठा येथील दलितवस्तीतील कामावर उद्या पाणी टाकून रोडरोलरने दबाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.