बोरगाव वैराळे येथील कोंडवाड्याची दुरवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:19 AM2021-07-30T04:19:58+5:302021-07-30T04:19:58+5:30
बोरगाव वैराळे या गावाची लोकसंख्या जवळजवळ १५०० असून या गावात शेतकरी व शेतमजूर यांच्याकडे जवळजवळ १ हजारापेक्षा अधिक गुरेढोरे ...
बोरगाव वैराळे या गावाची लोकसंख्या जवळजवळ १५०० असून या गावात शेतकरी व शेतमजूर यांच्याकडे जवळजवळ १ हजारापेक्षा अधिक गुरेढोरे आहेत. यातील काही गुरे हे बारमाही मोकाट सोडण्यात येतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी कोंडवाड्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
फोटो:
कोंडवाड्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे !
कोंडवाडा बांधकामात भ्रष्टाचार झाल्याने दोन वर्षात कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून कोंडवाड्याच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतने कोंडवाडा बंद करण्याचा निर्णय घेतला. कोंडवाडा बंद झाल्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न बुडत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकासाची कामे करण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी कोंडवाड्याची दुरूस्ती करण्यात यावी. शासनाने कोंडवाडा दुरूस्तीसाठी निधी द्यावा. अशी मागणी सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, माणिकराव वानखडे, श्रीराम वेते, पुष्पाताई वाकोडे, दीपाली बाहकर, शुभांगी अमरावते यांनी केली आहे.
कोंडवाड्यामध्ये अनेकांनी केले अतिक्रमण
कोंडवाड्याची दुरवस्था झाल्यामुळे गावातील अनेकांनी काेंडवाड्याच्या आवारात अतिक्रमण करून कुटार, पऱ्हाटी, तुराटी भरली आहे. काही लोक येथे गुरे बांधतात. ग्रामपंचायतने कोंडवाड्याच्या आवारातील अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.