आधार केंद्र सुरु करण्यास सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 07:35 PM2020-07-14T19:35:25+5:302020-07-14T19:35:39+5:30
प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे.
अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून आधार नोंदणी व दुरुस्ती केन्द्र सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सशर्त परवानगी एका आदेशाद्वारे दिली आहे. अटी व शर्तींच्या अधीन राहून आधार केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये सामग्री व उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घेणे आधार नोंदणी चालकास बंधनकारक राहील. केंद्र चालक व इतर आॅपरेटर यानी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. दर २० मिनिटांनी हात साबणाने धुणे, सॉनिटायझर वापरणे, तोंडाला मास्क किंवा स्वच्छ रुमाल वापरणे इत्यादी, आधारनोंदणी व दुरुस्ती केन्दामधील आॅपरेटर काम करताना नाक, तोड व डोळयांना स्पर्श होणार नाही याची आवश्यक दक्षता घेतील. आॅपरेटर व येणा-या नागरिकांनी पुर्णवेळ तोंडाला मास्क अथवा स्वच्छ रुमाल वापरावा, केवळ फोटो काढण्यासाठी मास्क काढण्यास परवानगी देण्यात येईल. आधार नोदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये येणाºया नागरिकांनी वैयक्तीक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे. आधार नोंदणी व दुरुस्तीकेंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक यांनी टेबल आॅपरेटर यांच्या बसण्याच्या जागे दरम्यान शारीरिक अंतर किमान एक मिटर असल्याचे सुनिश्चित करावयाचे आहे. पूर्वनोंदणी शिवाय येण्याची नागरिकांना परवानगी दिली जावू नये. नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे. नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला,ताप, कफ व श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादी सारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये न येणेबाबत फलक दर्शनी भागामध्ये लावावेत. प्रत्येक आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसारनागरिकांसाठी पत्रक दर्शनी भागात लावावेत. आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रामध्ये आॅपरेटरांनी कोव्हीड-१९ हॉटस्पॉटवर जाणे किंवा अशा भागातून प्रवास करू नये, प्रतिबंधीत क्षेत्रामधील भागातआधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करण्यात येऊ नयेत. येणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्यांची दैनदिन नोंद ठेवावी, आदी सुचना देण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेने शिक्षेस पात्र अपराध केला असे मानण्यात येवून योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.