पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 09:46 AM2017-11-28T09:46:36+5:302017-11-28T09:49:33+5:30

पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Confessions of the Guardian Minister's Assistant Theft! | पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकाकडे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांने दिली कबुली!

Next
ठळक मुद्देचोरट्यांकडून मुद्देमाल जप्तन्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे खासगी स्वीय सहायक  यांच्याकडे झालेल्या चोरीतील मुद्देमाल खदान पोलिसांनी चोरट्यांकडून  सोमवारी जप्त केला. या चोरट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता,  न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे स्वीय सहायक रवींद्र लोखंडे यांच्याकडे  मागील महिन्यात ४0 हजार रुपयांची चोरी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी  शहरातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात चोरांना पकडण्यासाठी नाकाबंदी केली हो ती. परंतु, घटनेनंतर पोलिसांना चोरट्यांचा तपास लागला नाही. दरम्यान, गुप्त  माहितीच्या आधारावर पोलिसांनी महेश करोडदे याला ताब्यात घेतले. त्याची  कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचा एक साथीदार  संजय जायले हा अजूनही पसार आहे. त्याचाही शोध पोलीस घेत असून, महेश  करोडदेकडून पोलिसांनी १२ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.  पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्याचा साथीदार संजय  जायले याचा तपास घेण्यात येत असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनचे  ठाणेदार संतोष महल्ले यांनी दिली. 

Web Title: Confessions of the Guardian Minister's Assistant Theft!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.