प्रतिबंधित सुंगंधी गुटखा जप्त; आरोपी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 10:49 AM2022-05-14T10:49:14+5:302022-05-14T10:49:52+5:30

Crime News : ५ हजार २२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा  जप्त करण्यात आला.

Confiscated banned aromatic gutkha; The accused passed | प्रतिबंधित सुंगंधी गुटखा जप्त; आरोपी पसार

प्रतिबंधित सुंगंधी गुटखा जप्त; आरोपी पसार

googlenewsNext

मूर्तिजापूर : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध साठवणूक करुन विक्री केल्या जात असल्याची ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यांतील शेलू बोंडे येथे धाड टाकून ५ हजार २२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठा पकडण्यात यश मिळाले, मात्र आरोपी पसार झाला. ही कारवाई १२ एप्रिल रोजी करण्यात आली. 
             शेलु बोंडे येथे नरेश गावंडे वय ५५ हा प्रतिबंधित गुटख्याचा साठा करुन विक्री करीत असल्याच्या गुप्त माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोविंद पांडव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, हेड पोलिस कॉन्स्टेबल नवलाखे इत्यादी च्या साहाय्याने शेलू बोंडे येथे आरोपी नरेश गावंडे यांच्या घरी धाड टाकली असता आरोपी याने पोलिसांना पाहताच पळ काढला, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो पसार झाला. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात विविध नावाचा ५ हजार २२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा  जप्त करण्यात आला. पसार फरार आरोपी विरुद्ध  सहकलम २६(२) गुटखा प्रतिबंध व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सत्यजित मानकर करीत आहे

Web Title: Confiscated banned aromatic gutkha; The accused passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.