पोळा साजरा करण्यासंदर्भात संभ्रम!

By admin | Published: August 31, 2016 02:56 AM2016-08-31T02:56:36+5:302016-08-31T02:56:36+5:30

पोळा सण बुधवारी करावा की गुरुवारी, हा संभ्रम कायम.

Confusion about celebrating polar! | पोळा साजरा करण्यासंदर्भात संभ्रम!

पोळा साजरा करण्यासंदर्भात संभ्रम!

Next

अकोला, दि. ३0: भारतीय संस्कृतीमध्ये पोळा उत्सवाला मोठे महत्त्व आहे. शेतकर्‍यांचा हा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गाळणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. पोळा हा श्रावणातील पिठोरी अमावस्येला येतो; परंतु नागरिकांमध्ये पोळा सण साजरा करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. काही कॅलेंडरमध्ये पोळा ३१ ऑगस्टला तर काही कॅलेंडरमध्ये १ सप्टेंबरला दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे कोणता पोळा साजरा करावा, याविषयी नागरिकांसह शेतकर्‍यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. कौटुंबिक पूजाविधी करणारे पुरोहित, भटजी यांच्याकडून कोणत्या दिवशी पोळा साजरा करावा, याविषयी अनेक जण माहिती घेत आहेत.
महाराष्ट्रामध्ये पोळा सणाला अनंत काळापासून महत्त्व आहे. शेतकर्‍यांसोबत शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी लाडक्या बैलांचे खांदे हळद, तुपाने चोळून, त्यांचा शृंगार केला जातो. ठोंबर्‍यासह पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. असा हा पोळा यावर्षी प्रथमच दोन वेगवेगळय़ा तारखांना दाखविल्या गेल्यामुळे नागरिक व शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पोळा कोणत्या दिवशी साजरा करावा, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. खरा पोळा कोणता, असा प्रश्न आपल्या भटजी, पुरोहिताकडे विचारल्या जात आहे.
दरवर्षी पोळा पिठोरी अमावस्येला येतो. यावर्षी दर्श पिठोरी अमावस्या ही ३१ ऑगस्ट रोजी आली आहे; परंतु काही कॅलेंडरमध्ये पोळा १ सप्टेंबर रोजी दर्शविण्यात आला असल्याने नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा गोंधळ उडालेला आहे. ग्रामीण भागात कोणत्या तारखेला पोळा साजरा करावा, याविषयी गावातील वयोवृद्ध व जाणत्या व्यक्तीला विचारणा होऊ लागली आहे; परंतु पोळय़ांच्या तारखांबाबत पंचांगाचे अभ्यासक, भटजी, पुरोहितांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून येते.
कोणी म्हणते, ३१ तारखेला पोळा साजरा करावा तर कोणी म्हणते १ सप्टेंबर रोजी करावा. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे.

तारखांबाबतचा घोळ पहिल्यांदाच
विविध कॅलेंडरमध्ये पोळा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दाखविण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पोळय़ाच्या दोन तारखांचा घोळ पहिल्यांदाच झाल्यामुळे नागरिक पोळय़ाची कोणती तारीख खरी आहे, कोणत्या तारखेला पोळा साजरा करावा, याबाबत विचारात पडले आहेत.

पोळा गुरुवारीच साजरा करण्याचे आवाहन
अकोला शहरात पोळा गुरुवारीच साजरा करण्याचा निर्णय मंगळवारी पोळा उत्सव समिती व पोळ्यात मान असलेल्या जुन्या-जाणत्या बैलजोडी मालकांनी घेतला आहे. पोळा ३१ ऑगस्टला की १ सप्टेंबरला, यावर नागरिकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता मंगळवारी दुपारी पोळा चौक येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंचांगानुसार पोळा १ सप्टेंबरलाच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनादेखील १ सप्टेंबरलाच पोळा साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला मानाच्या बैलजोडीचे मालक दशरथ वानखडे, नामदेव वानखडे, पोळा उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मालगे, दिलीप भगत, रामेश्‍वर वानखडे आदींसह बैलजोडी मालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Confusion about celebrating polar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.