टिटवा तलाठ्याकडून मतदार यादीत घोळ; ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:30+5:302020-12-04T04:53:30+5:30

टिटवा येथील तलाठी संदीप पळसपगार यांच्याकडून मतदार यादी तयार करण्याची मोहीम सुरू आहे; मात्र तलाठी हे मतदार यादी तयार ...

Confusion in voter list from Titwa Talatha; The villagers allege | टिटवा तलाठ्याकडून मतदार यादीत घोळ; ग्रामस्थांचा आरोप

टिटवा तलाठ्याकडून मतदार यादीत घोळ; ग्रामस्थांचा आरोप

Next

टिटवा येथील तलाठी संदीप पळसपगार यांच्याकडून मतदार यादी तयार करण्याची मोहीम सुरू आहे; मात्र तलाठी हे मतदार यादी तयार करताना गावात राजकारण करून हेवेदावे करीत असल्याचा आरोप तेथील प्रतिष्ठित नागरिक सतीश जयदेवराव गावंडे व इतरांनी केला आहे. सतीश जयदेवराव गावंडे हे वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये कित्येक वर्षांपासून राहत आहेत. तलाठ्याने गावातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून मतदार यादी तयार करताना त्यामध्ये जाणीवपूर्वक गावंडे हे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये राहात असताना, त्यांचे कुटुंबातील काही नावे वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये टाकले तर काही नावे वाॅर्ड क्रमांक एकमध्ये टाकले असल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून गावंडे हे वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये राहतात. त्यांच्याच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या वाॅर्डात कसे? ज्यावेळी नावाचा समावेश केला त्या वेळी विचारणा का करण्यात आली नाही? हरकत असतानाही एकाच कुटुंबातील नावे अनेक वार्डात कसे? टाकण्यात आले? तलाठ्याकडून ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर का दिल्या जात नाही? उडवाउडवीची उत्तरे दिले जात असल्याचा आरोप सतीश पाटील गावंडे यांनी केला आहे, यासंदर्भात न्यायालयात जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रशासनाने गावात राजकारण करणाऱ्या तलाठ्याविरुद्ध कारवाई करून आपणास न्याय द्यावा, अशी मागणी सतीश पाटील गावंडे यांनी केली आहे.

टिटवा येथील गावंडे कार्यालयात आले होते. त्यांनी या विषयी चर्चा केली. टिटवा येथे मतदार यादी तयार करताना चुका झाल्या असतील. नागरिकांनी हरकत घेतल्यास वरिष्ठ अधिकारी यासाठी निर्णय घेऊ शकतात.

गजानन डोंगरे, निवडणूक विभाग, बार्शीटाकळी

Web Title: Confusion in voter list from Titwa Talatha; The villagers allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.