पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
By admin | Published: October 7, 2015 02:06 AM2015-10-07T02:06:17+5:302015-10-07T02:06:17+5:30
दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी शहर काँग्रेसच्यावतीने मदनलाल धिंग्रा चौकात युती सरकारविरोधात उग्र निदर्शने.
अकोला: राज्यातील युती सरकारने विक्री करात पाच टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोल व डिझेलवरील कर प्रती लीटर दोन रुपयांनी वाढला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी शहर काँग्रेसच्यावतीने मदनलाल धिंग्रा चौकात युती सरकारविरोधात उग्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संपूर्ण राज्यभरात राज्य सरकारच्या विरोधात ५ व ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मदन भरगड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, मनपातील विरोधी पक्षनेता साजीद खान, माजी उपमहापौर रफिक सिद्दिकी, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील, उषा विरक, निखिलेश दिवेकर, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेश गणगणे यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.