काँग्रेस महानगर अध्यक्षांची नियुक्ती पदाधिका-यांना मान्य नाही!

By admin | Published: July 5, 2016 01:24 AM2016-07-05T01:24:46+5:302016-07-05T03:18:42+5:30

काँग्रेसच्या पदाधिका-यांची पत्र परिषद : आमरण उपोषणाचाही दिला इशारा.

Congress chief does not accept the appointment of Congress chief! | काँग्रेस महानगर अध्यक्षांची नियुक्ती पदाधिका-यांना मान्य नाही!

काँग्रेस महानगर अध्यक्षांची नियुक्ती पदाधिका-यांना मान्य नाही!

Next

अकोला: काँग्रेस प्रदेश कमेटीने २९ जून रोजी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्षपदी माजी आमदार बबनराव चौधरी यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्ती विरोधात त्याच दिवशी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता तो आता जाहीरपणे प्रकट झाला आहे. काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी विङ्म्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन चौधरी यांच्या नियुक्तीला विरोध केला असून ही नियुक्ती रद्द करण्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी बबनराव चौधरी महानगर अध्यक्षपदाचा प्रभार स्वीकारतील त्या दिवसापासून आमरण उपोषणाचाही इशारा दिल्याने विरोधाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अकोला शहर काँग्रेस कमेटीचे महासचिव राजेश भारती, अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार उषा विरक, अकोला जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रकाश तायडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव डॉ. झिशान हुसेन, प्रदेश महिला काँग्रेस महासचिव डॉ. वर्षा बडगुजर, सनियंत्रण समितीचे अध्यक्ष अविनाश देशमुख, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अंशुमन देशमुख, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, युवक काँग्रसचे महासचिव पराग कांबळे, शेख अब्दुल्लाह या नेत्यांनी नव्या महानगर अध्यक्षांच्या विरोधात एल्गार पुकारला. राजेश भारती यांनी सांगितले की, महानगर अध्यक्ष नियुक्तीसाठी पक्षाने कोणते निकष वापरले, याबाबत आम्हीच संभ्रमात आहोत. ज्या व्यक्तीने तीन-चार पक्ष बदलले, ज्यांच्या या जिल्ह्याशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तीच्या हातात अकोला नगराची सूत्रे देणे कोणत्याही निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्याला पटलेले नाही. आम्ही आमचा विरोध पक्षङ्म्रेष्ठींपर्यंत पोहोचविला असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत या नियुक्तीविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. उषा विरक यांनी सांगितले की, चौधरी यांनी अ.भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधातच पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते, अशा व्यक्तीच्या नेतृत्वात कोणीही निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता काम करणार नाही. प्रकाश तायडे यांनी अकोला शहरातील काँग्रेससाठी बबनरावांचे योगदान काय,असा सवाल करीत त्यांच्या नियुक्तीमुळे निष्ठावान काँग्रेसीला क्लेश झाले आहेत म्हणूनच आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे, तर पक्षङ्म्रेष्ठींनी या नियुक्तीबाबत फेरविचार करावा यासाठी आम्ही प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा लावून धरला असून यानंतरही बदल झाला नाही तर योग्य वेळी आम्ही भूमिका घेऊ, असे मत डॉ. झिशान हुसेन यांनी व्यक्त केले.

Web Title: Congress chief does not accept the appointment of Congress chief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.