कॉंग्रेसचा शहराध्यक्ष दुबे याला मलकापुरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:21+5:302021-07-18T04:14:21+5:30
शहरातील लसीकरण केंद्रात दि. ३१ मे रोजी कॉंग्रेसचा शहराध्यक्ष दिनेश दुबे सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. उपस्थित डॉ. हेमंत तायडे ...
शहरातील लसीकरण केंद्रात दि. ३१ मे रोजी कॉंग्रेसचा शहराध्यक्ष दिनेश दुबे सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. उपस्थित डॉ. हेमंत तायडे यांना आरोपींनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. लसीकरणादरम्यान राडा झाल्याने लसीकरण ठप्प झाले. पोलिसांनी या प्रकरणात प्रेम दुबे, सागर दुबे आरोपींना अटक केली, तर तिसरा आरोपी कॉंग्रेसचा शहराध्यक्ष दिनेश दुबे फरार झाला होता. न्यायालयाने शुक्रवारी त्याचा जामीन रद्द केल्यानंतर तो मलकापूर येथून रेल्वेने मुंबई येथे पळून जात असताना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी त्याला मलकापूर येथून अटक केली.
-------------------------------
दिनेश दुबेवर अनेक गुन्हे दाखल
कॉंग्रेसचा शहराध्यक्ष असलेला दिनेश दुबे हा गुंड प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गत वर्षापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते, तर शासकीय कामात अडथळे निर्माण करण्यासंदर्भात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
-----------------------
शहरात कॉंग्रेस अध्यक्षपद धोक्यात
दिनेश दुबे सराईत गुन्हेगार असून, त्याला तडीपार करण्यात आले होते, अशा तक्रारी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे गेल्या असल्याने त्याचे शहर कॉंग्रेस अध्यक्षपद काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
---------------------