कॉँग्रेसने उपसले हकालपट्टीचे हत्यार!

By Admin | Published: October 7, 2014 01:57 AM2014-10-07T01:57:58+5:302014-10-07T01:57:58+5:30

अकोला मनपाच्या सहा नगरसेवक, चार पदाधिका-यांचा समावेश; माजी उपमहापौर, गट नेत्यांवर कारवाई.

Congress extortionist extortionist! | कॉँग्रेसने उपसले हकालपट्टीचे हत्यार!

कॉँग्रेसने उपसले हकालपट्टीचे हत्यार!

googlenewsNext

अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार केल्याचा ठपका ठेवत, पक्षाने अकोला महापालिकेतील सहा नगरसेवकांसह एकूण १0 आजी-माजी पदाधिकार्‍यांची सोमवारी हकालपट्टी केली.
विधानसभा निवडणुकीत अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. उमेदवारी न मिळाल्याने कॉँग्रेसच्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचाराला सुरुवात केली. याप्रकरणी प्रदेश कॉँग्रेसकडे तक्रारीही करण्यात आल्या. कॉँग्रेसने या तक्रारींची चौकशी केली. चौकशीत सकृतदर्शनी तथ्य आढळून आल्याने १0 जणांना निलंबित करण्यात आले. यामध्ये माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफिक सिद्दीकी, महापालिकेचे गटनेता दिलीप देशमुख, नगरसेविका शेख रिजवाना शेख अजीज, जया विनोद गेडाम, कोकिळा गजानन डाबेराव, निकहत अफसर कुरेशी यांच्यासह सरचिटणीस राजेश भारती, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष शेख अजीज शेख सिकंदर, महासचिव अफसर कुरेशी, माजी नगरसेविका सुषमा अशोक निचळ यांचा समावेश आहे. निलंबनाचे आदेश प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वतीने सरचिटणीस अँड. गणेश पाटील यांनी जारी केले.

Web Title: Congress extortionist extortionist!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.