करवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:50 AM2017-08-19T01:50:17+5:302017-08-19T01:51:16+5:30
अकोला : महापालिकेने अव्वाच्या सव्वा दराने कर आकारणी केल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचा आरोप करीत मन पातील विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सायंकाळी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ‘ताटवाटी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी समोर न आल्यामुळे काँग्रेसने मुख्य रस्त्यावर ठिय्या देणे पसंत केले. वाहतूक विस्कळीत होत असल्याचे पाहून आंदोलनकर्त्यांना हटविण्यासाठी सिटी कोतवाली पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचे यावेळी दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिका प्रशासनाने २00१ मध्ये ‘सेल्फ असेसमेंट’द्वारे अ त्यल्प करवाढ केली होती. त्यानंतर प्रशासनाने दर तीन वर्षांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे भाग असताना मागील १५ वर्षां पासून एकदाही पुनर्मूल्यांकन केले नाही. या प्रक्रियेत प्रशासनाने कुचराई केल्याचे दिसत असले, तरी अकोलेकरांना मुळातच अ त्यल्प कर लागू असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे चटई क्षेत्रफळानुसार पहिल्यांदाच पुनर्मूल्यांकन करून प्रशासनाने सुधारित करवाढ लागू केल्यामुळे कराच्या रकमेत वाढ झाल्याचे दिसून येते. ही करवाढ अमान्य असल्याचे सांगत विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी वेळावेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. १९ ऑगस्ट रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत करवाढीचा मुद्दा पटलावर येणार आहे. त्या पृष्ठभूमीवर विरोधी पक्षनेता साजिद खान यांनी शुक्रवारी पुन्हा आंदोलनाची धार तीव्र केली. महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ‘ताटवाटी बजाओ’ आंदोलन छेडल्यानंतर याठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे कोण तेही पदाधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून काँग्रेसने महा पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. सत्ताधारी व प्रशासनाची भूमिका पाहता काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले. यामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याचे पाहून सिटी कोतवाली पोलिसांना आंदोलनक र्त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
आंदोलनात काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महा पौर मदन भरगड, उत्तर झोन सभापती मोहम्मद नौशाद, नगरसेवक जिशान हुसेन, पराग कांबळे, इरफान खान, कपिल रावदेव, महिला आघाडी महानगराध्यक्ष सुषमा निचळ, रवी शिंदे, नि िखलेश दिवेकर, कशीश खान, आकाश कवडे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी होते.
अकोलेकरांवर लादलेला कर कमी नव्हे, तर रद्द करावा, ही काँग्रेसची आग्रही मागणी आहे आणि राहील. आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर केला. यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे दिसून आले.
-साजिद खान, विरोधी पक्षनेता मनपा