काँग्रेस-राकाँच्या पदाधिका-यांना फटकारले!

By admin | Published: October 13, 2016 02:50 AM2016-10-13T02:50:23+5:302016-10-13T02:50:23+5:30

संघटन बांधणीसाठी पदाधिका-यांची मरगळ दिसून आल्याने पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली.

Congress office bearers rebuked! | काँग्रेस-राकाँच्या पदाधिका-यांना फटकारले!

काँग्रेस-राकाँच्या पदाधिका-यांना फटकारले!

Next

अकोला, दि. १२- आगामी महापालिकेच्या निवडणुक तोंडावर असताना पक्षनेत्यांमध्ये अजूनही मरगळ कायम असल्याची टीका करीत अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना पक्षश्रेष्ठींनी फटकारले आहे. सर्व नेते मंडळीसमोर झालेल्या या प्रकाराची चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.
काँग्रेसची अमरावतीला आणि राष्ट्रवादीची नागपुरात पक्षश्रेष्ठींनी बैठक घेतली. या दोन्ही बैठकीत अकोल्यातील स्थानिक पदाधिकार्‍यांच्या संघटन बांधणीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुका तोंडावर असतानादेखील पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या बैठका आणि मोर्चे बांधण.ीला सुरुवात झालेली नाही ही बाब पक्षङ्म्रेष्ठींनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांना लक्षात आणुन दिल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे अकोला जिल्हा पदाधिकारी या बैठकीला गेले होते. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करीत तालुका बैठका वाढविण्याच्या सूचना पदाधिकारी यांना केल्यात.तसेच, जिल्ह्यातील मोर्चेबांधणीचा आढावाही घेतला. त्यामुळेच काँग्रेसने पक्षसंघटनेसाठी आता बैठका घेणे सुरू केले आहे.
राष्ट्रवादीची बैठक गेल्याच आठवडयात नागपुरात पार पडली. या बैठकीत एका माजी आमदारांना आणि एका ज्येष्ठ नेत्यांला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलण्याची देखील संधी दिली नाही. कुणाला पक्ष बांधणीवरही एखादी शार्टफिल्म काढा, चित्रपट खूप झालेत. असे सुनावले तर कुणाचा बँकेच्या बाहेर निघा, पक्ष सांभाळा अशा शब्दात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी समाचार घेतला. निवडणुका लागल्या, की उमेदवार आ.णि कार्यकर्ते उगवतात. मोर्चेबांधणीचे प्रयोगही तेव्हाच सुरू होतात. त्यामुळे यंदा तसे करू नका, आतापासूनच संघटन विणण्याचे कामास लागा, असे आवाहनही केले.
अकोल्यातील राजकीय क्षेत्रात सध्या हीच चर्चा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे.

Web Title: Congress office bearers rebuked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.