अकोट येथे काँग्रेसचा ‘संकल्प दिन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:34+5:302021-06-20T04:14:34+5:30
अकोट : तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. १९ रोजी ‘संकल्प दिन’ साजरा करीत केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन केले. संकल्प दिनाला ...
अकोट : तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. १९ रोजी ‘संकल्प दिन’ साजरा करीत केंद्र सरकारच्याविरोधात आंदोलन केले. संकल्प दिनाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून तहसील कार्यालयाच्या बाहेर केंद्राने जाहीर केलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायदाच्या प्रति जाळून निषेध व्यक्त केला.
कोरोनाच्या संकटात शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जीविताशी खेळ केला असून, ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. ‘संकल्प दिवस’ साजरा करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्राने जाहीर केलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या प्रति जाळून विरोध केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अकोटचे माजी नगराध्यक्ष प्रा. संजय बोडखे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रमोद चोरे, जिल्हा महासचिव ॲड. मनोज खंडारे, माजी नगरसेवक संजय आठवले, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. निनाद मानकर, मुकुंद पांडे, घनश्याम बिजने, न. प. माजी उपाध्यक्ष अफजल खान, विलास घाटोळ, मा. नगरसेवक मोहसीन भाई, विष्णू कासदेकर सदस्य पंचायत समिती, युवक काँग्रेसचे मयूर निमकर, गजीक शेख, आझमखां पठाण, अर्शद देशमुख, राजा बाबू, कुणाल जोत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.