काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होण्याची गरज - उदय देशमुख

By admin | Published: May 20, 2014 11:32 PM2014-05-20T23:32:25+5:302014-05-20T23:56:10+5:30

अकोला : जिल्‘ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्य परिस्थितीत एकसंघ होऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश कमेटीचे प्रतिनिधी प्रा. उदय देशमुख यांनी केले आहे.

Congress workers need to be united - Uday Deshmukh | काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होण्याची गरज - उदय देशमुख

काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होण्याची गरज - उदय देशमुख

Next

अकोला : जिल्‘ातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सद्य परिस्थितीत एकसंघ होऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या प्रदेश कमेटीचे प्रतिनिधी प्रा. उदय देशमुख यांनी केले आहे.
विकासाच्या नावाने देशातील मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात मतदान केले नाही, असा दावा करणार्‍या प्रा. देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून काही चुका झाल्याचे मान्य केले. सर्वच राजकीय पक्षाच्या हातून अशा चुका झाल्या; परंतु राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यापासून पद्धतशीर वाचविण्याचे कार्य पक्ष नेतृत्वाने केले. सरळमार्गी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र हा प्रयत्न केला नाही. प्रसारमाध्यमांमध्ये काँग्रेसची बदनामी झाल्यामुळे जनमानसात काँग्रेस पक्ष विरोधी मत तयार झाले. आर्थिक भ्रष्टाचाराचे कुणीही समर्थन करणार नाही; परंतु आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा जात आणि धर्माचा आधार घेऊन राजकारण करणे हा देशासाठी दूरदृष्टीचा विचार केला, तर जास्त धोकादायक असल्याचे प्रा. देशमुख म्हणाले.
पक्षांतर्गत जीवघेणी स्पर्धा व त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्यांची गळपेची करण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये झाला. राजकारण या गोंडस नावाखाली त्यावर पांघरूण घातल्या गेल्याचे मत प्रा. देशमुख यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्षाचा मूळ विचार सर्वधर्म समभाव, त्याग व बलिदान या गोष्टींना तिलांजली देत स्वार्थी लोकांनी फक्त सत्ता डोळ्यासमोर ठेवून पक्षाचा वापर केला. या सर्व बाबी लक्षा ठेवून निष्ठावंत, पक्षाप्रती प्रामाणिक समाज व देशासाठी नि:स्वार्थी सेवा करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन नव्या दमाने कामास लागण्याचे आवाहन प्रा. देशमुख यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे

Web Title: Congress workers need to be united - Uday Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.