संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसचा मोर्चा!
By admin | Published: July 10, 2015 01:27 AM2015-07-10T01:27:11+5:302015-07-10T01:27:11+5:30
केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी.
अकोला : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक संकटांचा सामना करणारा महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकर्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी केली. या मोर्चात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकर्यांनी बैलगाड्यांसह उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेली पिके उध्वस्त झाली. काही पिके थोड्याफार प्रमाणात आली; पण त्यालाही योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक संजय खोडके, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महागरअध्यक्ष मदन भरगड, माजीमंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातीकोद्दीन खतीब, ज्ञानदेवराव ठाकरे, बबनराव चौधरी आदींसह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.